-
ऋजुता लुकतुके
भारतीय शेअर बाजाराला सध्या अनिश्चित वातावरणाचा मुकाबला करावा लागत आहे. घसरता रुपया, अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणामुळे प्रस्तावित व्यापारी युद्ध यांचा सामना भारतीय बाजारांना करावा लागत आहे. त्यामुळे बहुतेक कंपन्यांचे शेअर खाली आले आहेत. नॅटको फार्मा कंपनीलाही मागच्या आठवड्यात जवळपास १० टक्के नुकसान सहन करावं लागलं आहे. (Natco Pharma)
मागच्या ५ दिवसांत शेअर ९.४४ टक्के किंवा ८३ अंशांनी खाली येऊन ७९८ वर बंद झाला आहे. शुक्रवारी एका दिवशी शेअरमध्ये थोडीफार तेजी होती आणि तो ५ अंशांनी सुधारला. बाकी शेअरमध्ये मंदीचंच वातावरण आहे आणि शेअर वर्षभरातील निच्चांकी पातळीच्या जवळ पोहोचला आहे. (Natco Pharma)
(हेही वाचा – २३ फेब्रुवारी : Gadge Maharaj यांची जयंती; जाणून घ्या महाराजांचा जीवन परिचय)
याच आठवड्यात गुरुवारी शेअर वर्षातील निच्चांकी पातळी ७९० वर पोहोचला. अमेरिकेतील व्यापारी युद्धाचा खूप मोठा फटका या शेअरला बसला आहे. मागच्या महिनाभरात शेअर ३६ टक्क्यांनी घसरला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी इनिंग सुरू झाल्यापासून भारतातून होणाऱ्या फार्मा आयातीबद्दल त्यांची भूमिका संदिग्ध आहे. सुरुवातीला आयात शुल्क वाढीतून फार्मा कंपन्यांना सूट मिळेल असं ते म्हणाले होते. पण, गेल्याच आठवड्यात अचानक त्यांनी २५ टक्के इतक्या आयात शुल्काची घोषणा केली आणि तिथून फार्मा कंपन्यांचे शेअर घसरायला सुरुवात झाली. (Natco Pharma)
ही शुल्कवाढ कधी सुरू होणार हे ट्रम्प यांनी सांगितलं नाही. पण, फार्मा कंपन्यांना अमेरिकेत उत्पादन सुरू करण्यासाठी मुदत देणार असल्याचं ते म्हणाले. एकीकडे ही नकारात्मक बातमी असली तरी दुसरीकडे नॅटको फार्मा कंपनी अमेरिकेतील औषध कंपन्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे हा आयात शुल्काचा मुद्दाही निकालात निघेल असं फार्मा कंपन्यांना वाटत आहे. तसं झालं तर कंपनीसाठी विस्ताराची ही नवीन संधी असेल आणि त्याचा फायदा नॅटको फार्माला दीर्घ मुदतीत बसू शकतो. (Natco Pharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community