National Family Health Survey : देशात सर्वाधिक वृत्तपत्र वाचक केरळमध्ये! महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

86

आजच्या डिजिटल युगात देशभरातील महत्वाच्या घडामोडींचे आपण ऑनलाइन अपडेट घेतो. त्यामुळे वर्तमानपत्र वाचकांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. अलिकडे वर्तमानपत्र सुद्धा डिजिटली वाचले जाते. गुगलवर सर्च केले तरी तुम्हाला प्रत्येक बातमीचे अपडेट मिळतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार महिला व पुरूष वर्तमानपत्र वाचकांची स्वतंत्र आकडेवारी काढण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ( २०१९-२०२१) आणि इंडिया इन पिक्सेल यांच्या अहवालामार्फत महिला व पुरूषांची वर्तमानपत्र वाचनाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आठवड्यातून किमान एकदा वर्तमानपत्र वाचणाऱ्या महिला व पुरूष वाचकांची स्वतंत्र टक्केवारी खालीलप्रमाणे… 

सर्वाधिक महिला वाचक असणारी राज्य सर्वाधिक पुरूष वाचक असणारी राज्य
केरळ – ५८ टक्के केरळ – ६५.९ टक्के
गोवा – ४७ टक्के गोवा – ५८.९ टक्के
मिझोराम – ३८.६ टक्के मिझोराम – ४३ टक्के
कर्नाटक – २८.६ टक्के कर्नाटक – ४२.७ टक्के
महाराष्ट्र – २१ टक्के तेलंगणा – ४१.६ टक्के
दिल्ली – २०.३ टक्के महाराष्ट्र – ४०.१ टक्के

 

या आकडेवारीनुसार सर्वाधिक महिला वर्तमानपत्र वाचकांच्या आकडेवारीत केरळ पहिल्या तर महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो तसेच सर्वाधिक पुरुष वर्तमानपत्र वाचकांच्या आकडेवारीत सुद्धा केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. संपूर्ण देशात मेघालय हे एकमेव राज्य आहे जिथे महिला ( १७.८ टक्के) वाचकांचे प्रमाण पुरूष ( १२.८टक्के) वाचकांपेक्षा सर्वाधिक आहे.

महिला – पुरूष वाचकसंख्येतील सर्वाधिक फरक असलेली राज्य पुरुष आणि महिला वाचकसंख्येत कमीत कमी फरक असलेली राज्य
तेलंगणा – 24.5% अरुणाचल प्रदेश – 2.1%
राजस्थान – 22.3% सिक्कीम – 3.1%
बिहार – 20.8% मिझोराम – 4.4%
उत्तर प्रदेश – 20.5% पंजाब – 4.6%
तामिळनाडू, आंध्र, झारखंड – 19.2% आसाम, मेघालय – 5%

 

देशातील महत्वाच्या शहरांमध्ये वाचक संख्या कमी का?

वाचकांच्या टक्केवारीत महाराष्ट्राचे स्थान गोवा, मिझोराम, कर्नाटक या राज्यांपेक्षाही मागे आहे. पुणे शहर संपूर्ण देशभरात विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तरीही महाराष्ट्रातील वाचक संख्या कमी होण्याचे कारण काय? यावर काही सामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, सध्याचे राजकारण पाहता मुंबई-पुणे या धावपळीच्या शहरांमधील सामाजिक स्थिती, दैनंदिन प्रश्न जाणून घेण्यात नागरिकांना अधिक रस आहे. म्हणूनच समाजमाध्यमांवर एखादा सामाजिक प्रश्न विचारला असता त्यावर नागरिक समाजमाध्यमाच्या भाषेत react होतात तर याउलट राजकारणात फारसा रस दाखवत नाही. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांनासुद्धा वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा या सिरियलमध्ये काय घडले, भाज्यांचे दर जाणून घेण्यात अधिक रस असतो असे निदर्शनास आले आहे.

घटता आलेख

New Project 7 1

मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू या देशातील महत्वाच्या शहरांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, गॅझेट्सचा वापर केला जातो. त्यामुळे वृत्तपत्र वाचनापेक्षा डिजिटल माध्यमांवर बातम्या दिल्या जातात. तसेच नागरिकांकडून पारंपरिक वृत्तपत्रांपेक्षा ई-पेपरचे वाचन केले जाते.

New Project 6 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.