मोबाईलमधील प्री-इन्स्टॉल अॅपही आता हटवता येणार

लोकांसह राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन स्मार्टफोनमधील पूर्वस्थापित अॅपही फोनमधून हटवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विचार केंद्र सरकारने चालवला आहे. त्यासाठी नियमात बदल केला जाणार आहे.

प्रस्तावित नियमानुसार, कंपन्यांना स्मार्टफोनमध्ये आधीच स्थापित असलेले अॅप काढून टाकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे सॅमसंग, शाओमी, विवो आणि अॅपल यांसारख्या कंपन्यांवर परिणाम होईल. नव्या फोनच्या लाॅंचिंगवर याचा परिणाम होऊ शकतो.

( हेही वाचा: राज्यात उष्णतेची लाट; उष्माघातापासून वाचण्यासाठी ‘हे’ करा, ‘हे’ करु नका, जाणून घ्या सविस्तर )

काय आहे सुरक्षेचा मुद्दा?

  • एका वरिष्ठ सरकारी अधिका-याने सांगितले की, पूर्वस्थापित अॅप सुरक्षेच्यादृष्टीने कमजोर सिद्ध होऊ शकतात. त्यांचा हेरगिरीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे विदेशी शक्ती त्याचा फायदा घेऊ शकतात.
  • याबाबतीत चिनी मोबाईल अधिक धोकादायक ठरु शकतात. सैनिकांच्या परिवारांनी चिनी मोबाईल वापरु नयेत, असा सल्ला गुप्तचर संस्थांनी अलीकडेच दिला आहे.
  • चीनच्या 300 अॅप्सवर भारताने बंदी घातली आहे. इतरही अनेक देशांनी चिनी अॅप्सवर कारवाई केली आहे. हुवावेसारख्या काही चिनी कंपन्यांवर अमेरिकेसह अनेक देशांनी बंदीही घातली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here