पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक दक्षिण कमांड हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर युद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून उभारण्यात आलं आहे. हे दक्षिण आशियातील एकमेव युद्ध स्मारक आहे जे पूर्णपणे नागरिकांच्या योगदानातून बांधले गेले आहे. म्हणूनच या स्मारकाला विशेष महत्त्व आहे. (National War Museum)
(हेही वाचा – CM Pushkar Dhami : औरंगजेबपूर बनले शिवाजी नगर ; १५ गावांची नावे बदलण्याची उत्तराखंड सरकारची घोषणा)
प्रमुख वैशिष्ट्ये :
प्रदर्शने :
स्मारकात दक्षिण कमांडने वर्षानुवर्षे वापरलेल्या उपकरणांचे प्रदर्शन ठेवलेले आहे, ज्यात गणवेश, दारूगोळा, वाहने, टाक्या आणि तोफा यांचा समावेश आहे. यात कारगिल युद्धात वापरलेले मिग-२३बीएन विमान आणि गोवा मुक्ती आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भूमिका बजावणाऱ्या आयएनएस त्रिशूलची प्रतिकृती देखील आहे. (National War Museum)
गॅलरी :
विशेष म्हणजे इथे येणार्या प्रेक्षकांना इत्यंभूत माहिती मिळावी म्हणून युद्धकाळातील छायाचित्रे, दुर्मिळ चित्रे आणि ध्वज प्रदर्शित करणार्या चार मोठे गॅलरी आहेत.
लाईट आणि साउंड शो :
दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात दक्षिण कमांडच्या इतिहासाचे आणि कामगिरीचे वर्णन केले जाते, त्यांचा पराकरम यातून अधोरेखित होतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच हा शो आवडतो. (National War Museum)
देशभक्तीपर वातावरण :
भिंतींवर हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत आणि पार्श्वभूमीवर देशभक्तीपर गाणी वाजवली जातात. जेणेकरुन इथे येणारा प्रत्येक माणूस देशभक्तीचे बाळकडू घेऊनच बाहेर पडेल.
(हेही वाचा – Ratangad : सह्याद्रीचा रत्न म्हणून ओळखल्या जाणार्या रतनगडाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?)
अतिरिक्त सुविधा :
स्मारकात स्वच्छ शौचालये, एक कॅफे आणि पर्यटकांसाठी पेंटबॉल क्षेत्र देखील आहे. म्हणूनच इथे कोणाचीही गैरसोय होत नाही.
ठिकाण आणि वेळ :
पत्ता : प्रिन्स ऑफ वेल्स ड्राइव्ह, घोरपुरी लाईन्स, दोबरवाडी, घोरपडी, पुणे, महाराष्ट्र ४११००१३.
वेळा : दररोज सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत सुरु.
प्रवेश शुल्क : मोफत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community