मोड आलेली कडधान्ये दररोज खाल्ली, तर मल्टीव्हिटॅमिनची (Health Tips) आवश्यकता भासणार नाही. मोड आलेल्या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. मोड आलेल्या १०० ग्रॅम मिश्र कडधान्यांमध्ये जवळपास ३२ कॅलरी असतात. यामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश हा एक उत्तम पर्याय आहे.
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅलरीची मात्रा खूप कमी असते. १०० ग्रॅम मोड आलेल्या मिश्र कडधान्यांमध्ये जवळपास ३२ कॅलरीज असतात. जाणून घेऊया, मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करण्याचे महत्त्व –
– कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि पोटॅशियम यासारख्या खनिजांचा उत्तम स्त्रोत कडधान्यांमध्ये असतो. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. दातांचे आरोग्य चांगले राहते. मॅग्नेशियममुळे स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. लोह रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुरळीत ठेवण्यास मदत करते, तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
– मोड आलेल्या कडधान्यांमध्ये एन्झाइमची मात्रा सर्वाधिक असते. या एन्झाइममुळे पचनसंस्थेला अन्नातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत होते.
– प्रीबायोटिक म्हणून मोड आलेली कडधान्ये काम करतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. प्रतिकारक्षमता वाढते.
(हेही वाचा – Recruitment : कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा जीआर रद्द करा – अधिकारी महासंघाचा इशारा)
आहारात समावेश कसा कराल ?
– सकाळच्या नाश्ता म्हणून तुम्ही मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन करू शकता. ऑम्लेटमध्ये ताजी कडधान्ये घाला. दह्याबरोबरही याचं सेवन करू शकता.
– दुपारच्या जेवणात सॅलडमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करू शकता.
– मोड आलेल्या कडधान्यांचा डबा नेहमी फ्रिजमध्ये ठेवा. स्नॅक्ससाठी हा एक चांगला पौष्टिक पर्याय आहे.
हेही पहा –