Naturally Home Remedies : आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, वाढत्या वजनावर रामबाण उपाय

127
Naturally Home Remedies : आहारात करा 'या' फळांचा समावेश, वाढत्या वजनावर रामबाण उपाय
Naturally Home Remedies : आहारात करा 'या' फळांचा समावेश, वाढत्या वजनावर रामबाण उपाय

बैठी कामे करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. वाढता ताण, धावपळीची जीवनशैली, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी…यामुळे पोटावरची चरबी अतिरिक्त वाढते. यामुळे पोट सुटते. शरीराचा आकार बेढब होतो. यामुळे हल्ली अनेकांना लठ्ठपणाची समस्या उद्भवते. वजनवाढीवर बरेच जण नाना तऱ्हेचे उपाय करत असतात. लठ्ठपणा कमी करणे त्रासदायक होते, मात्र काही वेळा सोपे उपायही परिणामकारक ठरू शकतात. यासाठी आहारात 5 फळांचा समावेश करणे सुटलेल्या पोटावर रामबाण उपाय ठरू शकतो.

किवी
वजन कमी करण्यासाठी किवी खाणे हा रामबाण उपाय आहे. जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व के, फोलेट आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किवी खाल्ल्याने वजन कमी व्हायला मदत होते. एका अभ्यासानुसार, १२ आठवडे रोज २ किवी फळ खाल्ल्याने कमरेवरची चरबी १.२ इंच कमी झाली. कंबरेवर अतिरिक्त चरबी जमा झाली असेल तर किवी फळाचा वापर करावा, हे त्वरीत वजन कमी करण्यास मदत करते.

अवाकाडो
अवाकाडो हे फळ अनेक आरोग्याच्या तक्रारीपासून सुटका मिळवून देते. अवाकाडो पोषक तत्वांनी भरलेले आहे आणि स्वाद अधिक चांगला असतो. हे फळ वजन घटविण्यासाठी अत्यंत परिणामकारक मानले जाते. अवाकाडोमध्ये कॅलरी आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. एका अभ्यासानुसार, रोज १ अवाकाडोचे सेवन केल्याने १२ आठवड्यात वजन कमी होते. तसंच अवाकाडो खाल्ल्याने पोट भरलेले राहाते आणि भूकही कमी लागते. हे फळ कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते.

(हेही वाचा – World Cleanliness Day 2023 : ‘प्ले अँड शाइन फाउंडेशन’तर्फे माहीम रेती बंदर समुद्रकिनाऱ्यावर राबवली स्वच्छता मोहीम )

सफरचंद
वजन घटविण्यासाठी आणि चरबी विरघळविण्यासाठी सफरचंदाचा वापर करावा. सफरचंदामध्ये स्वस्थ फ्लेवोनॉईड्स आणि फायबर असतात, जे पोटातील चरबी जाळण्यास मदत करतात. विशेषतः पॅक्टिन फायबरयुक्त अधिक असते, जे वेट लॉससाठी अत्यंत उपयुक्त आहे. सफरचंदाममध्ये असणारे फायबर हे पोट अधिक काळ भरलेले ठेवते, तेव्हा स्वाभाविक रूपात कमी खाऊ शकता, त्यात कॅलरी काऊंट कमी असते. सफरचंदात कॅलरी आणि साखरेचे प्रमाणही कमी असते, जे वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय ठरते.

(हेही वाचा  – Cabinet Meeting In Sambhaji Nagar : मराठवाड्यातील सिंचनासाठी 59 हजार कोटींची तरतूद; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)

पेरू
आरोग्यासाठी पेरू अत्यंत लाभदायक मानले जाते. पेरूमध्ये डाएटरी फायबर अधिक प्रमाणात असून पोट पटकन भरते आणि ओव्हरइटिंगपासून तुम्ही वाचता. पेरूमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स अर्थात GI अत्यंत कमी असून रक्ततील साखर यामुळे वाढत नाही आणि डायबिटीस रुग्ण हे अत्यंत बेफिकिरपणे खाऊ शकतात. पेरू इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी अधिक चांगली करून डायबिटीस नियंत्रणात आणण्यास आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते.

बेरीज
स्ट्रॉबेरी आणि रासबेरीसह वेगवेगळ्या बेरीज या शरीरासाठी चरबी कमी करण्यासह उपयुक्त ठरतात आणि अत्यंत परिणामकारक मानल्या जातात. वेट लॉस करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही सर्व बेरीजचे सेवन नक्कीच करायला हवे. यामध्ये अनेक विटामिन आणि मिनरल्स असतात, जे वेट लॉस करण्यासाठी सोपे ठरते. बेरीजच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर अधिक नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. तसंच शरीरावरील सूज कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.