शारदीय नवरात्रीची सुरूवात २६ सप्टेंबरपासून होणार आहे. २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरा केला जाईल. या उत्सवाचे प्रामुख्याने महिला वर्गांमध्ये विशेष आकर्षण असते. दोन वर्षांनी पुन्हा एकदा यंदा हा सण मोठ्या जल्लोषात देशभरात साजरा केला जाणार आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये ९ दिवस ९ रंगांचे कपडे परिधान केले जातात. त्यामुळे गरबा खेळताना, नऊ दिवस रोज ऑफिसला जाताना सुद्धा लोक मोठ्या हौशेने हे रंग फॉलो करतात.
( बेस्ट उपक्रमाचे वीजग्राहकांना आवाहन! बनावट SMS पासून सतर्क रहा; अन्यथा होऊ शकते आर्थिक फसवणूक)
नवरात्री २०२२ चे नवरंग खालीलप्रमाणे आहेत…
- २६ सप्टेंबर प्रतिपदा – पहिला दिवस – पांढरा
- २७ सप्टेंबर द्वितीया – दुसरा दिवस – लाल
- २८ सप्टेंबर तृतीया – तिसरा दिवस – रॉयल ब्लू
- २९ सप्टेंबर चतुर्थी – चौथा दिवस – पिवळा
- ३० सप्टेंबर पंचमी – पाचवा दिवस – हिरवा
- १ ऑक्टोबर षष्ठी – सहावा दिवस – राखाडी
- २ ऑक्टोबर सप्तमी – सातवा दिवस – नारंगी
- ३ ऑक्टोबर अष्टमी – आठवा दिवस – मोरपिसी
- ४ ऑक्टोबर नवमी – नववा दिवस – गुलाबी