nehru science centre : काय आहे नेहरु सायन्स सेंटरमधील आकर्षण?

129
nehru science centre : काय आहे नेहरु सायन्स सेंटरमधील आकर्षण?

नेहरू सायन्स सेंटरमध्ये (nehru science centre) सायन्स पार्क आणि विविध दालनांमध्ये ऊर्जा, ध्वनी, गतिशीलता, यांत्रिकी, वाहतूक इत्यादींवरील ५०० हून विज्ञान प्रदर्शने आहेत. अनोखे वास्तुकलेसह एनएससी इमारतीत विविध विषयांवरील अनेक विज्ञान प्रदर्शने उपलब्ध आहेत.

मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र (nehru science centre) हे भारतातील सर्वात मोठे विज्ञान केंद्र आहे. वरळीतील डॉ. ई. मोझेस रोडवर स्थित, हे विज्ञान मनोरंजनसाठी आणि सर्व वयोगटांसाठी प्रवेशयोग्य आहे. इथे शिक्षणासह मनोरंजनही होते. १९७७ मध्ये या केंद्राची सुरुवात ‘लाइट अँड साईट’ प्रदर्शनाने झाली आणि त्यानंतर १९७९ मध्ये सायन्स पार्क बांधण्यात आले. ११ नोव्हेंबर १९८५ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी उद्घाटन केले.

(हेही वाचा – taraporewala aquarium : तारापोरवाला मत्स्यालयात कोणकोणते मासे पाहू शकाल?)

देशातील सर्वात मोठे विज्ञान केंद्र (nehru science centre) असलेल्या नेहरू सायन्स सेंटर ८ एकर (३२,००० चौरस मीटर) मध्ये पसरलेले आहे. इथे विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे व एक विशाल विज्ञान उद्यान आहे. नेहरू विज्ञान केंद्र हे NCSM च्या चार राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान संग्रहालयांपैकी एक आहे.

नागपूर, भोपाळ, धरमपूर आणि गोवा येथे चार विज्ञान केंद्रांसह ‘पश्चिम क्षेत्र मुख्यालय’ म्हणून इथे काम पाहिले जाते. या केंद्रामार्फत नियमितपणे सामान्य लोकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी व्यापक विज्ञान शिक्षण कार्यक्रम, उपक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात.

(हेही वाचा – Thackeray vs Rane: मालवणमध्ये भाजपा आणि उबाठा आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी)

रोज सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत इथे अनेक लोक येतात आणि वैज्ञानिक मनोरंजक अनुभव घेतात. इथला ३डी सायन्स शो देखील लोकांना आकर्षक करतो. हा शो बघताना तुम्ही स्वतःच त्या जगात गेल्याचा अनुभव तुम्हाला होतो.

इथल्या गार्डनमध्ये विविध वैज्ञानिक खेळ आहेत, जे खेळण्यात विद्यार्थी आणि पालकही मंत्रमुग्ध होतात. तुम्ही या सायन्स सेंटरमध्ये गेलात तर तुम्हाला बाहेर यावसं वाटणार नाही, इतकं मन रमून जातं. मुंबईतील अनेक आकर्षक स्थळांपैकी एक असलेले हे केंद्र भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची साक्ष देते आणि भविष्यातील वैज्ञानिकांना चालना देते. (nehru science centre)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.