नेरुळ (Nerul) हे नवी मुंबई, महाराष्ट्रातलं एक अपमार्केट रेसिडेंशल आणि कमर्शियल ठिकाण आहे. नेरुळ हे मुंबई लोकल ट्रेन नेटवर्कच्या हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन्स आणि नेरुळ-उरण लाईनचं मध्यवर्ती स्थानक आहे. खारघर आणि वाशी ही नेरुळच्या जवळची स्थानकं आहेत.
नेरुळ (Nerul) हे त्याच्या समांतर पाम-बीच रोडसाठी देखील प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त इथे रॉक गार्डन आणि अत्याधुनिक इमारतींच्या संरचनेसारख्या उद्यानांसाठी नेरळ प्रसिद्ध आहे.
भौगोलिक स्थिती
नेरुळ (Nerul) इथल्या जय भवानी रोडवरील सेक्टर-२०च्या समोर असलेल्या सेक्टर-१८ इथे असलेल्या तलावाच्या आजूबाजूला रेसिडेंशल एरिया आणि लहान मुलांसाठी प्ले पार्क आहे. या तलावाच्या आजूबाजूला नारळाची झाडं लावून रस्ता सुशोभित करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Dona Paula Beach Goa या बीचला का भेट द्याल? आणि काय काय मज्जा कराल?)
गणेश चतुर्थी आणि नवरात्री यांसारख्या सणांमध्ये या तलावात भगवान गणेश आणि दुर्गा देवीच्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं. हे तलाव चौकोनी आकाराचं असून तेरा फूट खोल आहे. नेरुळच्या सेक्टर-२३ येथे आणखी एक तलाव आहे. हे तलाव दारावे तलाव म्हणून ओळखलं जातं.
तसंच जर तुम्हाला नेरुळमध्ये फिरायला जायचं असेल तर डी.वाय. पाटील स्टेडियम, पारसिक हिल्स, ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेक्टर १८ चा नाका, रॉक गार्डन, बालाजी हिल्स, फ्लेमिंगो पॉइंट, नेरूळ जेट्टी, सोमेश्वर मंदिर, शिव मंदिर, शनी मंदिर, सेक्टर २८ अशी अनेक ठिकाणं फिरण्यायोग्य आहेत.
सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल
मुंबईतला सर्वात मोठा ट्रान्झिट मॉल नेरूळ (Nerul) इथल्या सीवूड्स दारावे रेल्वे स्थानकावर आहे. या मॉलच्या डाव्या बाजूला दोन इमारती आणि उजव्या बाजूला दोन इमारती आहेत. या दोन्ही इमारती कार्पोरेट ऑफिस कॉम्प्लेससाठी वापरलेल्या आहेत. त्याच परिसरात L&T चे गृहनिर्माण कॉम्प्लेक्स देखील आहेत. हे कॉम्प्लेस सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community