सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वाचा कल हा वेब सिरीजकडे अधिक झुकलेला आहे. त्यामुळे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म (Netflix) आपला प्रेक्षक वर्ग वाढवण्यासाठी नवनवीन योजना करत असतात. ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी आपल्याला त्याचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. नेटफ्लिक्सची कार्यपद्धती नुसार त्या अकाऊंटवरून आपण आपला पासवर्ड आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये देखील शेअर करू शकतो. मात्र आता असं करता येणार नाही. नेटफ्लिक्सने आता पासवर्ड शेअरवर बंदी घातली आहे. नेटफ्लिक्सने (Netflix) आपल्या युजर्सना मेल करून याबाबतची माहिती दिली आहे.
त्या मेलमध्ये सांगितल्यानुसार आता युजर्स नेटफ्लिक्सचे (Netflix) त्यांचे अकाउंट फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरातील सदस्यांसाठी वापरू शकतात. मात्र घराबाहेर व्यक्तीला ते त्यांचा पासवर्ड देऊ शकत नाही. मात्र घराबाहेरील कोणी सदस्य ते अकाउंट वापरत असेल तर मूळ सब्सक्रायबर याला आपल्या प्रोफाइलला एका नवीन अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे लागेल. मात्र त्यासाठी त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागतील, आणि आपला पासवर्ड देखील बदलावा लागेल.
(हेही वाचा – Muslim : शनी मंदिरातला पुजारी निघाला गुल्लू खान; पोलिसांनी केली अटक )
मागील काही महिन्यांपासून नेटफ्लिक्स (Netflix) आपल्या पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालणार अशा चर्चा होत्या. आजपासून म्हणजेच गुरुवार २० जुलै पासून भारतात नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करता येणार नाही.
भारताप्रमाणेच नेटफ्लिक्स (Netflix) लवकरच यूएसए, कॅनडा, स्पेन, न्यूझीलंड इत्यादी विविध देशांमध्ये देखील पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community