मानव-केंद्रित, हायब्रिड एआयने आणल्या नवीन क्षमता; Samsung चे वॉन-जून चोई यांची माहिती

109
मानव-केंद्रित, हायब्रिड एआयने आणल्या नवीन क्षमता; Samsung चे वॉन-जून चोई यांची माहिती

संपूर्ण विश्‍व तंत्रज्ञानामधील सर्वात उत्‍साहवर्धक आणि ऐतिहासिक क्षणांच्‍या शुभारंभाच्‍या टप्‍प्‍यावर आहे. मोबाइल एआयचे युग आले आहे, ज्‍याअंतर्गत सॅमसंगने पहिला एआय फोन गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजवर गॅलॅक्‍सी एआय वैशिष्‍ट्ये सादर केली. (Samsung)

हायब्रिड एआय दृष्टिकोनासह मोबाइल अनुभवांमध्‍ये क्रांतिकारी बदल

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजमध्‍ये जनरेटिव्‍ह एआय तंत्रज्ञानाच्‍या वास्‍तविक फायद्यांची भर करण्‍यासाठी सॅमसंगने एआय इंटीग्रेशनप्रती हायब्रिड दृष्टिकोन अंगिकारला. एआय अनेक क्षमता देते आणि सॅमसंगचा विश्‍वास आहे की मोबाइल डिवाईसेस या क्षमता अनलॉक करण्‍यासाठी प्रमुख अॅक्‍सेस पॉइण्‍ट आहेत, जेथे जगभरातील वापरकर्ते त्‍यांच्‍या दैनंदिन गरजांसाठी स्‍मार्टफोन्‍सवर अवलंबून आहेत. (Samsung)

मोबाइल डिवाईसेस व्‍यक्‍तींच्‍या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याचा अर्थ असा की ते अत्‍यंत वैयक्तिक डिवाईसेस आहेत, ज्‍यांचा व्‍यक्‍ती अनेक महत्त्वपूर्ण व संस्‍मरणीय क्षणांदरम्‍यान वापर करतात. सॅमसंगला या पद्धतींबाबत माहित आहे, तसेच सॅमसंगचा विश्‍वास आहे की स्‍मार्टफोन्‍सनी अधिक कार्यरत राहिले पाहिजे, ज्‍यामुळे वापरकर्ते सोप्‍या, अधिक सर्वोत्तम व एपिक पद्धतीने महत्त्वपूर्ण क्षणांना कॅप्‍चर करू शकतात. सॅमसंगला गोपनीयतेचे महत्त्‍व देखील माहित आहे, ज्‍यामुळे ब्रँड वापरकर्त्‍यांना शेअर करणाऱ्या आणि गोपनीय ठेवणाऱ्या बाबींवर पूर्णत: नियंत्रण ठेवण्‍यास देतो. (Samsung)

”आमचा विश्‍वास आहे की, आमचा हायब्रिड दृष्टिकोन या सर्व गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आणि सॅमसंगला अग्रस्‍थानी ठेवण्‍यासाठी सर्वात व्‍यावहारिक व विश्‍वसनीय सोल्‍यूशन आहे. आम्‍ही वापरकर्त्‍यांना दैनंदिन जीवनासाठी आवश्‍यक असलेले विविध फंक्‍शन्‍स प्रदान करण्‍यामध्‍ये उद्योग-अग्रणी सहयोगींसोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून ऑन-डिवाईस एआयचा त्‍वरित प्रतिसाद व अतिरिक्‍त गोपनीयता हमी आणि क्‍लाऊड-आधारित एआयची विविधता यामध्‍ये संतुलन देत आहोत,” असे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स येथील मोबाइल इएक्‍सपेरिअन्‍स बिझनेसच्‍या मोबाइल आरअँडडी ऑफिसचे कार्यकारी उपाध्‍यक्ष व प्रमुख वॉन-जून चोई म्‍हणाले. (Samsung)

(हेही वाचा – Investment Alert : वॉट्‌सॲप, टेलिग्रामवरील सल्ल्यानुसार गुंतवणूक करणाऱ्यांना एनएससीने केलं सावध)

ऑन-डिवाईस एआयसह क्षमतांमध्‍ये वाढ

सॅमसंगने लाइव्‍ह ट्रान्‍सलेट वैशिष्‍ट्याला ऑन-डिवाईस एआय आधारित केले, कारण वॉईस कॉल्‍स स्‍मार्टफोनचे सर्वात मुलभूत वैशिष्‍ट्य असले तरी संवादाचे अंतर्गत व खाजगी माध्‍यम आहे. सॅमसंग वापरकर्त्‍यांना भाषेसंदर्भात अडथळ्यांशिवाय संवाद साधण्‍यास सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, तसेच प्रत्‍येक संवाद सुरक्षित व खाजगी असण्‍याची खात्री घेत आहे. ”या वैशिष्‍ट्याला वास्‍तविकतेत आणण्‍यासाठी आमच्‍या आरअँडडी टीमने सहयोगात्‍मक प्रक्रियेचा भाग म्‍हणून दिवस-रात्र अथक मेहनत घेतली, ज्‍यामधून आमच्‍या टीम्‍समधील सर्वोत्तम क्षमता प्रकाशझोतात आल्‍या. एआय लँग्‍वेज मॉडेल्‍सचा योग्‍य आकार निर्धारित करण्‍यापासून प्रशिक्षण आणि वास्‍तविक स्थितींमध्‍ये चाचणी करण्‍यापर्यंत एमएक्‍स व्‍यवसायामधील आमच्‍या आरअँडडी कंपन्‍यांनी स्‍वत:ला आव्‍हान दिले आणि या वैशिष्‍ट्याला ऑन-डिवाईस कार्यान्वित करण्‍यासाठी आम्‍ही विचार केलेल्‍या शक्‍यतांमधील मर्यादांना दूर केले,” असे चोई म्‍हणाले. (Samsung)

संमसंगचे जगभरातील जागतिक आरअँडडी नेटवर्क्‍स सर्वोत्तम टॅलेंट्सना निपुण करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहेत आणि प्रत्‍येक प्रांतामध्‍ये मुलभूत तंत्रज्ञान विकसित करत आहेत. या नेटवर्क्‍सनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलंड, चीन, भारत व व्हिएतनामसह जगभरातील सॅमसंग रिसर्च सेंटर्स गॅलॅक्‍सी एआयद्वारे समर्थित भाषांचा विकास व विस्‍तार करण्‍याप्रती समर्पित आहेत. भाषा अत्‍यंत सांस्‍कृतिक, समकालीन व स्‍थानिक आहेत, ज्‍यामुळे व्‍यक्‍ती भाषेसंदर्भातील अडथळ्यांना दूर करत अधिक सहजपणे संवाद साधू शकतात. अधिकाधिक प्रांतांमधील वापरकर्त्‍यांसाठी नवीन क्षमता सादर करण्‍यामध्‍ये आमच्‍या स्‍थानिक आरअँडडी कार्यालयांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. (Samsung)

या सर्व प्रयत्‍नांमुळे सॅमसंग नवीन काहीतरी सादर करण्‍यास सक्षम झाली आहे, जे शेअर करण्‍यासाठी आम्‍ही उत्‍सुक आहोत. लवकरच, सॅमसंग वॉईस कॉल्‍सना सपोर्ट करण्‍यासाठी इतर थर्ड-पार्टी मेसेज अॅप्‍सना लाइव्‍ह ट्रान्‍सलेट वैशिष्‍ट्य विस्‍तारित करत सॅमसंगच्‍या स्‍वत:च्‍या नेटिव्‍ह कॉलिंग अॅपव्‍यतिरिक्‍त गॅलॅक्‍सी एआयच्‍या क्षमता विस्‍तारित करत आहे. ज्‍यामुळे तुम्‍ही मित्र किंवा सहकाऱ्यांच्‍या संपर्कात राहू शकता, आवडत्‍या अॅप्‍सवर विविध भाषांमध्‍ये संवाद साधू शकता. हे वैशिष्‍ट्य आमच्‍या ऑन-डिवाईस एआय लँग्‍वेज ट्रान्‍सलेशन मॉडेलमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आले असल्‍यामुळे वापरकर्ते लाइव्‍ह ट्रान्‍सलेटचा वापर करताना फोनमधील वैयक्तिक डेटा इतरांना शेअर होणे अशा गोपनीयतेसंदर्भातील समस्‍यांबाबत चिंता न करता मुक्‍तपणे संवाद साधू शकतील. (Samsung)

सॅमसंगला अपेक्षा आहे की आधुनिक चिप्‍स, विशेषत: एनपीयूची इंटेलिजण्‍ट कम्‍प्‍युटिंग क्षमता इतर तंत्रज्ञानांसह अत्‍यंत गतीशीलपणे प्रगत होत असताना मोबाइल डिवाईसेसमध्‍ये अधिकाधिक मोबाइल एआय वैशिष्‍ट्यांची भर होईल. यामुळे अधिकाधिक व्‍यक्‍ती एआयचा अवलंब करत दैनंदिन टास्‍क्‍स अधिक सोईस्‍करपणे करण्‍यास सक्षम होतील, ज्‍यामधून त्‍यांना अधिक मन:शांती मिळेल. (Samsung)

आजपासून भावी गरजांसाठी गॅलॅक्‍सी एआयमध्‍ये वाढ

”ही उत्‍साहवर्धक बातमी गॅलॅक्‍सी एआयप्रती आमच्‍या कटिबद्धतेच्‍या विस्‍तारीकरणाचा भाग आहे आणि मोबाइल एआय युगाच्‍या पुढील टप्‍प्‍यामध्‍ये प्रवेश करत आहे. गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजमध्‍ये गॅलॅक्‍सी एआयचे सादरीकरण फक्‍त सुरूवात होती. पूर्णत: नवीन व अद्वितीय एआय अनुभव देण्‍यासाठी आम्‍ही आगामी फोल्‍डेबल डिवाईसेससाठी गॅलॅक्‍सी एआय अनुभव अधिक ऑप्टिमाइज करू. आमचे फोल्‍डेबल्‍स सॅमसंग गॅलॅक्‍सीमधील सर्वात वैविध्‍यपूर्ण व स्थिर फॉर्म फॅक्‍टर आहेत आणि गॅलॅक्‍सी एआयसह एकत्र केल्‍या की दोन्‍ही पूरक तंत्रज्ञान एकत्रित नवीन क्षमता अनलॉक करतील,” असे चोई म्‍हणाले. सॅमसंग व्‍यापक गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टममध्‍ये गॅलॅक्‍सी एआय अनुभव विस्‍तारित करण्‍याप्रती देखील कटिबद्ध आहे, जे फक्‍त सॅमसंग करू शकते. मोबाइल एआय युग झपाट्याने प्रगती करत असताना सॅमसंग फक्‍त आजच्‍या नाही तर भावी गरजांची पूर्तता करण्‍यासाठी मोबाइल एआय इनोव्‍हेशन्‍सना गती देत आहे. (Samsung)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.