आधार कार्ड भारतीय नागरिकांचे महत्वाचे ओळखपत्र आहे. अलिकडे सर्व महत्वाच्या कामकाजांमध्ये आधार कार्ड अनिवार्य असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI सुद्धा आधार कार्डविषयक वेळोवेळी माहिती देत असते. म्हणूनच सरकारने सुधारणा करत आधार कार्ड पडताळणीबाबत नवे नियम जारी केले आहेत. काय आहेत हे नियम जाणून घेऊया…
( हेही वाचा : पश्चिम घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी देशातील पहिली फॉरेस्ट ‘कॅनोपी’ ट्रेन! )
आता तुमच्या आधारकार्डचे इंटरनेटशिवाय म्हणजेच ऑफलाईन असतानाही तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. आता तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्र देता येणार आहेत. परंतु ही डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केलेली असावीत.
नव्या नियमांनुसार ग्राहकांच्या माहितीला ई-केवायसी (KYC)असे नाव देण्यात आले आहे. ही माहिती संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असेल. ई-केवायसी व्हेरिफिकेशनसाठी कोणत्याही अधिकृत एजन्सीला आपला आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी देता येऊ शकेल. यानंतर माहितीची पडताळणी करूनच प्रक्रिया पुढे नेली जाईल. आधार पेपरलेस ऑफलाईन ई-केवायसी म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेला दस्तऐवज जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केलेला आहे.
ऑफलाईन व्हेरिफिकेशनचे प्रकार
- क्यू आर कोड पडताळणी
- आधार पेपरलेस ऑफलाईन ई-केवायसी पडताळणी
- ई-आधार पडताळणी
- ऑफलाईन पेपर आधारित पडताळणी