आता Road Trip होणार सुरक्षित! १ ऑक्टोबरपासून गाडीच्या टायर्स संदर्भात नवे नियम

देशभरातील रस्ते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता सरकारने प्रत्येक गाड्यांमध्ये सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. आता वाहनांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. वाहनांच्या टायर्सच्या डिझाईनमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आली असून १ ऑक्टोबरपासून नवीन डिझाईननुसार टायर बनवण्यात येणार आहे. पुढील वर्षी १ एप्रिलपासून नवीन टायरसह वाहनांची विक्री केली जाणार आहे. या नव्या नियमांतर्गत यामध्ये C1, C2, C3 श्रेणीतील टायर्सचा समावेश करण्यात आला असून या तिन्ही श्रेणींसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांचा असंतोष दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील! ड्युटी शेड्युलमध्ये सुधारणा होणार?)

नवी नियमावली 

  • १ ऑक्टोबर २०२२ पासून टायर डिझाइनसाठी नवे नियम
  • इंधन कार्यक्षमतेनुसार टायर्सला स्टार रेटिंग देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रेटिंग पाहून ग्राहकाला सुरक्षित आणि सर्वोत्तम टायर निवडण्यास मदत होईल.
  • वाहनांची टायर्सची गुणवत्ता आणि डिझाइन आता AIS – 142:2019 नुसार असेल. रस्त्यावरील घर्षण, ओल्या रस्त्यावरील पकड आणि वेगावर नियंत्रण तसेच वाहन चालवताना होणारा आवाज यानुसार नवीन टायर सुरक्षित करावे लागतील.
  • ५ स्टार रेटिंग टायर्समुळे इंधन वाचवण्यासाठी आणि मायलेज वाढवण्यासाठी मदत मिळेल.
  • नवीन डिझाईनमुळे रस्त्यावर टायर्सला चांगली पकड मिळेल आणि टायर्सचा दर्जाही पूर्वीपेक्षा चांगला असेल.
  • निकृष्ट टायरची आयात बंद होणार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here