‘हे’ आहेत नववर्षाचे ५ लोकप्रिय संकल्प!

83

दरवर्षी नवीन वर्ष आले की, लोक विविध संकल्प करत असतात. परंतु, या सर्वच संकल्पांचे लोकांकडून अल्पावधी काळासाठीच पालन केले जाते. वर्षाच्या सुरुवातीस, सर्वजण पूर्ण उत्साहाने त्यांच्या संकल्पाचे पालन करतात. पण जसे काही आठवडे, महिने जातात तसे ही संकल्पांची यादी बाजूला सरते. नववर्षाच्या ५ लोकप्रिय संकल्पांविषयी जाणून घेऊया.

नववर्षाचे ५ लोकप्रिय संकल्प

पैसे वाचवा :  आम्ही अधिक पैसे वाचवू आणि चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक सुरू करू, हा दरवर्षीचा महत्वाचा व प्रत्येक कुटुंबात घेतला जाणारा सामायिक निर्णय असतो. काहींना ते साध्य करता येतं, तर काही लोकांना शक्य होत नाही. यासाठी दर महिन्याला योग्य ती रक्कम साठवणे आवश्यक असते.

( हेही वाचा : अरे देवा…आता डॉक्टर गेले संपावर )

धूम्रपान आणि मद्यपान सोडणे : धूम्रपान आणि मद्यपान सोडण्याचा आणखी एक लोकप्रिय आणि सामान्य संकल्प लोक घेतात.

नवीन कौशल्य किंवा छंद शिकणे : नवीन कौशल्य शिकणे हे कायम आपले उद्दिष्ट असते. तसेच हा संकल्प कायम आपल्या नवीन वर्षाच्या संकल्पाच्या यादीत असतो.

आयोजन/नियोजन: तुमच्या दिवसाचे नियोजन करणे, दैनंदिन गोष्टी लिहिणे, जबाबदारीने वागणे या गोष्टी नवीन वर्षाच्या संकल्पाचा भाग आहेत. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळवण्याचे ध्येय ठेवणे किंवा वक्तशीर राहण्यासाठी तुमच्या वेळेचे नियोजन करणे हे सुद्धा नवीन वर्षाचे सामान्य संकल्प आहेत.

व्यायाम:  व्यायाम, वजन कमी करणे किंवा निरोगी राहणे. हा संकल्प हमखास प्रत्येकाच्या यादीत असतो. परंतु कालांतराने दिनचर्येमुळे व्यायाम, जिम करण्यास वेळ मिळत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.