अ‍ॅनेमियाग्रस्त महिलांची नवजात बालकं ७ टक्के कमी वजनाची!

105

गर्भवतींमधील अ‍ॅनेमियाचं प्रमाण लक्षात घेता जन्मलेल्या बाळावर होणा-या परिणामाबाबत वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे. याबाबत डॉ जगदीश कुमार, एन आशा, डॉ श्रीनिवास मूर्ती, एम एस सुजाता, व्ही जी मंजूगथ या दक्षिण भारतातील सरकारी रुग्णालयांत काम करणा-या बालरोगतज्ज्ञांच्या टीमचा अहवाल हे प्रमाण नगण्य असल्याचं सांगतोय. अ‍ॅनेमियाग्रस्त महिलांच्या बाळांमध्ये कमी वजनाचे प्रमाण हे केवळ ७ टक्के असल्याचं त्यांच्या अहवालात नमूद करण्यात आलं.

नवजात अडीच किलोपेक्षाही कमी वजनाची

अ‍ॅनेमियाग्रस्त गर्भवतींची नवजात बालके अडीच किलोपेक्षाही कमी वजनाची जन्माला येतात. कमी वजनाची मुले हीच केवळ अ‍ॅनेमियाग्रस्त गर्भवतींची समस्या नाही तर या महिलांमध्ये पाच महिन्यांच्या आसपासच प्रसूती होते. सदतीसाव्या आठवड्यात प्रसूती होण्याचं प्रमाण २४.३६ टक्के महिलांमध्ये आढळून येतं, असंही डॉ. जगदीश कुमार यांच्या सर्वेक्षणात नमूद केलं आहे.

(हेही वाचा- मुलींच्या पौंगडावस्थेतील लोहाची कमतरता वाढवा, स्त्रीरोगतज्ज्ञांचं आवाहन)

लोहाच्या कमतरतेमुळे होतो अ‍ॅनेमिया

अ‍ॅनेमिया हा शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा पोषणासंबंधित आजार आहे. याकडे दुर्लक्ष करु नये. कित्येकदा महिलांमध्ये सुरुवातीपासूनच नाव नोंदण्याची सवय नसते. गर्भवती महिलांमध्ये अ‍ॅनेमियाच्या आजारामुळे मुलांवर होणा-या परिणामाचे प्रमाण कमी असले तरीही ज्या मुलांमध्ये हा प्रकार दिसतो, त्याचे दूरगामी परिणार होत असल्याची माहिती सूर्या रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ नंदकिशोर काब्रा देतात.

विकसित देशांत अशा गर्भवतींचं प्रमाण जास्त

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०११ मधील अभ्यासानुसार तब्बल ५७ टक्के विकसित देशांमधील स्त्रियांमध्ये अनेमिया जास्त बळकावतोय. तर १४ टक्के विकसित देशांमधील स्त्रिया अनेमियाग्रस्त आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.