-
ऋजुता लुकतुके
निस्सानची कॉम्पॅक्ट एसयुव्ही गाडी मॅग्नेट आता नवीन रुपात लाँच करण्यात आली आहे. गाडीतील इंजिन हे जुनंच म्हणजे १ लीटर पेट्रोल आणि १ लीटर टर्बो पेट्रोलचं आहे. पण, यावेळी या गाडीची निर्मिती पूर्णपणे भारतात झाली आहे. आणि निर्यात होणाऱ्या मॅग्नेट गाड्याही भारतातच बनणार आहेत. अगदी डाव्या बाजूला स्टिअरिंग व्हील असलेली गाडीही भारतातच बनणार आहे. विशेष म्हणजे नवीन मॅग्नेट कार लाँच करताना कंपनीने खास सवलतही देऊ केली आहे. म्हणजे पहिल्या १०,००० गाड्या या सवलतीच्या ५.९९ लाख रुपये किमतीत मिळणार आहेत. (Nissan Magnite 2024)
नवीन मॅग्नेटचा चेहरा मोहरा हा जास्त आक्रमक आणि प्रिमिअम श्रेणीचा आहे. गाडीचं ग्रील जास्त भारदस्त आणि त्याला रुपेरी रंगाची फ्रेम देण्यात आली आहे. तर फ्रेमच्या वरच्या बाजूला अख्खी एलएडी दिव्यांची माळ आहे. मॅग्नेटची मागची बाजू आधी होती तशीच आहे. फक्त एलसीडी दिवे जाऊन त्याजागी एलईडी दिवे आले आहेत. (Nissan Magnite 2024)
(हेही वाचा – Samsung Galaxy S24 FE : अखेर सॅमसंग एस२४ एफई फोन जगभरात लाँच, काय आहेत सुरुवातीच्या ऑफर?)
2024 Nissan Magnite Launched#nissan #magnite #rushlane pic.twitter.com/ITcyMVkXhY
— RushLane (@rushlane) October 4, 2024
मॅग्नेटचं आतलं रुपडं मात्र पूर्णपणे बदललेलं आहे. यावेळी आतून कॉपर म्हणजे तांब्याचा रंग वापरण्यात आलाय. आणि आतील एसी व्हेंटची रचना तर लँबॉर्गिनीसारखी आहे. गाडीचा डॅशबोर्ड फारसा बदललेला नाही. फक्त स्टिअरिंग व्हील आता काळ्या रंगाचं आहे. गाडीत सुरक्षेसाठी ६ एअरबॅग आहेत. तर चालकाच्या पुढे ३६० अंशांचा कॅमेराही बसवण्यात आलाय. त्यामुळे गाडी पार्क करताना आणि एरवीही चालकाला मदत मिळणार आहे. (Nissan Magnite 2024)
शिवाय गाडीत सी टाईप चार्जिंग पोर्ट आहे. इंजिनात बदल झालेले नाहीत. आधीप्रमाणेच यात १ लीटर पेट्रोलचं ७१ बीएचपी क्षमतेचं इंजिन तर टर्बो इंजिन ९९ बीएचपी क्षमतेचं आहे. गाडीत एएमटी व्हर्जनही उपलब्ध आहे. आणि गाडीतील सगळ्यात प्रिमिअम श्रेणीची गाडी ११.५ लाख रुपयांची आहे. (Nissan Magnite 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community