Nissan X-Trail : निस्सान एक्सट्रेलची चौथ्या पिढीची एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत नेमकी कधी अवतरणार?

निस्सान एक्सट्रेल गाडी अखेर भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

251
Nissan X-Trail : निस्सान एक्सट्रेलची चौथ्या पिढीची एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत नेमकी कधी अवतरणार?
  • ऋजुता लुकतुके

निस्सान एक्सट्रेल एसयुव्ही गाडीने युरोपीयन आणि ऑस्ट्रेलियन बाजारपेठ गाजवल्यानंतर आता ही गाडी यावर्षीच्या मध्यावर भारतातही प्रवेश करणार आहे. नुकतीच बंगळुरू आणि हैद्राबादच्या रस्त्यांवर गाडीचं टेस्ट ड्राईव्ह सुरू असल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर सांगितलंय. नेमकेपणाने सांगायचं तर कंपनी मे २०२४ मध्ये गाडीचं बुकिंग सुरू करेल अशी शक्यता आहे. (Nissan X-Trail)

निस्सानची ही मध्यम श्रेणीतील एसयुव्ही गाडी जगभरात १.५ लीटर पेट्रोल इंजिनवर चालते. टर्बो पेट्रोल इंजिन १६३ पीएस आणि ३०० एनएम इतकी शक्ती निर्माण करू शकतं. तर हायब्रीड असलेली गाडी २०४ पीएस इतक्या ताकदीने चालते. भारतातील ऑटो एक्पोमध्ये कंपनीने यापूर्वीच ही गाडी दाखवली आहे. आता तिची वैशिष्ट्य पाहूया, (Nissan X-Trail)

(हेही वाचा – Rahul Gandhi आज सुलतानपूर न्यायालयात हजर होणार, जाणून घ्या काय आहे प्रकरण?)

गाडीची किंमत इतक्या लाखांपासून सुरू

भारतात दाखल होणाऱ्या निस्सान एक्सट्रेलचं इंजिन तर जागतिक स्तरावर वापरात असलेलंच इंजिन असेल. पण, इंटिरिअरमध्ये काही बदल होऊ शकतात. गाडीतील इन्फोटेनमेंट डिस्प्ले हा १२.३ इंचांचा असेल. तर वायरलेस ॲपल कार-प्ले, हेड-अप डिस्प्ले, गाडीतील तापमान नियंत्रित करण्याची सोय तसंच चालकाची सीट आठही दिशांना ॲडजस्ट करता येईल, अशा सोयी या गाडीत अपेक्षित आहेत. (Nissan X-Trail)

चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तर गाडीत अत्याधुनिक सुविधा आहेत. ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंन्स सिस्टिम, चालकाने मार्गिका बदलू नये यासाठीची यंत्रणा, रस्त्यावरील चालकासाठी असलेली चिन्हं ओळखणारी यंत्रणा अशा सुविधा यात असतील. महत्त्वाचं म्हणजे या गाडीची किंमत ४० लाखांपासून सुरू होईल. टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लॉस्टर, इसुझु एमयुएक्स आणि महिंद्रा ऑल्टरस जी४ या गाड्यांशी तिची स्पर्धा असेल. (Nissan X-Trail)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.