म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताय? SEBI च्या या नियमाकडे लक्ष द्या, नाहीतर होईल नुकसान

196

गुंतवलेल्या पैशांवर बँकेपेक्षा जास्त व्याजदराने पैसे मिळवण्यासाठी गुंतवणूकदार Mutual Fund मध्ये गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीचा गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा होतो. पण Securitues and Exchange Board of India(SEBI) कडून आता म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी सक्तीचा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार, गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आता नॉमिनेशन करणे बंधनकारक असणार आहे.

SEBI चा नियम

1 ऑगस्ट 2022 पासून म्युच्युअल फंडच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता आपल्या कुटुंबातील व्यक्तीची नॉमिनी म्हणून नोंदणी करणे सक्तीचे असणार आहे. याआधी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी देखील हा नियम लागू असणार आहे. SEBI ने एक पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. नॉमिनेशनसाठी 31 मार्च 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले नॉमिनेशन झाले आहे याची खात्री करून घ्यावी, नाहीतर खूप मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो.

(हेही वाचाः ट्रेनच्या डब्यांवरील नंबरमधले हे ‘रहस्य’ जाणून घ्या, प्रवासात होईल मोठा फायदा)

नाहीतर अकाऊंट होणार फ्रीज

दिलेल्या मुदतीत नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण न केल्यास गुंतवणूकदारांचे D-mat अकाऊंट फ्रीज करण्याचा इशाराही सेबीने पत्रकाद्वारे दिला आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांना आपल्या डी-मॅट खात्यात कोणतेही व्यवहार करता येणार नाही. त्यांच्या या खात्यातील पैसे बँकेत जमा केले जातील, असेही सेबीने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.