देशातील ‘हे’ शहर होणार शुध्द शाकाहारी!

गुजरातमधील अहमदाबाद शहरात सार्वजनिक रस्ते, शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या शंभर मीटरच्या परिघात मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे. असे निर्देश जारी करणारी अहमदाबाद चौथी महानगरपालिका ठरली आहे. यापूर्वी राजकोट, वडोदरा आणि भावनगर महानगरपालिकांच्या राजकीय नेत्यांनी मुख्य रस्त्यांवरून मांसाहारी खाद्यपदार्थांच्या गाड्या हटविण्याचे निर्देश जारी केले होते.

तक्रारींमुळे निर्णय

“शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा प्रश्न नसून, लोक हवे ते खायला मोकळे आहेत”. पण दुकानांवर विकले जाणारे खाद्यपदार्थ हानीकारक नसावेत यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये” हा यामागील प्रमुख उद्देश होता. असे, मत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी व्यक्त केले. तर, या गाड्यांमधून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी, विशेषत: मॉर्निंग वॉक, धार्मिक स्थळांना भेट देणारे रहिवासी आणि पालक यांच्याकडून येत होत्या. लहान मुलांच्या मनावर यामुळे नकारात्मक प्रभाव होतो. यामुळे हा निर्णय घेण्यात आला. असे, एएमसीच्या टाउन प्लॅनिंग आणि इस्टेट मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष देवांग दाणी यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : जुळ्या बहिणींची ‘किमया’, नेहरू आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन! )

राज्यभर अंमलबजावणी नाही

वडोदरा आणि राजकोट महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना सांगितले होते की रस्त्यावरून मांसाहारी खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवू नका. असे, भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी स्पष्ट केले. खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवण्याचा निर्णय हा, प्रत्येक महानगरपालिकांचे वैयक्तिक मत होते. भाजपाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही राज्यभर त्याची अंमलबजावणी करणार नाही, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here