Diet : गहू नाही तर ‘या’ गोष्टीचे पीठ आहे जास्त आरोग्यदायी; महिन्याभरात घटवू शकता वजन

269

वजन घटवण्याची इच्छा सर्वांनाच असते. परंतू, प्रत्येकाला व्यायाम करायला वेळ नसतो. अशा परिस्थितीत जर एखाद्याला जिममध्ये न जाता वजन कमी करायचे असेल तर त्याला रोजच्या आहारात बदल करावा लागेल. साधारणपणे आपण रोज गव्हाचे पीठ खातो, पण वजन कमी करायचे असेल तर शिंघाड्याच्या पिठाचे सेवन करावे लागेल. शिंघाडा हे अतिशय चवदार फळ आहे जे पाण्यात उगवले जाते. म्हणूनच काही लोक याला ‘वॉटर फ्रूट’ असेही म्हणतात.

शिंघाड्यामध्ये आढळणारे पोषक घटक

शिंघाडा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात वजन कमी करण्याचे गुणधर्म आहेत, म्हणून अनेक आरोग्य तज्ञ शिंघाड्याचा वापर आपल्या आहारात करण्याची शिफारस करतात. नवरात्रीच्या उपवासातही बहुतेक लोक शिंघाड्यापासून बनवलेले पदार्थ सेवन करतात. शिंघाड्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतात.

diet

(हेही वाचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार २०२३’)

शिंघाड्याच्या पीठाचे अन्य फायदे

  • ज्या लोकांना थायरॉईडशी संबंधित समस्या आहेत त्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात शिंघाड्याच्या पिठाचा समावेश करावा कारण त्यात व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम आणि आयोडीन आढळतात.
  • जर नाष्ट्यामध्ये शिंघाड्याच्या पीठापासून बनवलेली चपाती खाल्ल्यास शरीरात दिवसभर उर्जा कायम राहील आणि सामान्य क्रिया करण्यात अडचण येत नाही.
  • शिंघाड्याच्या पीठात भरपूर पोटॅशियम असते, तसेच त्यात सोडियमचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे ते रक्तदाब वाढण्यापासून रोखते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.