- ऋजुता लुकतुके
प्रत्येक इलेक्ट्रिकल उत्पादन आणि आधुनिक वाहनांची पुढची पिढी लाँच होते तेव्हा किमती साधारणपणे आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त असतात. आणि सुविधाही जास्त आणि आधुनिक असतात. नथिंग या फोनच्या बाबतीत मात्र संस्थापक कार्ल पाय यांनी वेगळाच पवित्रा घेतला आहे. आधीच्या फोनच्या तुलनेत ते पुढील प्रत्येक मॉडेलची किंमत कमी करणार आहेत. (Nothing Phone (2a))
६ मार्चला नथिंग फोन २ए लाँच होत आहे. आणि तो नथिंग फोन १ पेक्षा किमतीने कमी असेल हे स्पष्ट आहे. कार्ल पाय यांनी यावेळी भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठीच अलीकडे आपल्या ट्विटर खात्यावर त्यांनी आपलं नाव बदलून कार्ल ‘भाई’ केलं आहे. इतकंच नाही तर नथिंगचे पुढील फोन भारतात तयार होतील, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. या फोनची किंमत ३०,००० रुपयांपेक्षा कमीच असेल असा अंदाज आहे. या फोनची वैशिष्ट्य पाहूया. त्यापूर्वी लंडनमध्ये नथिंग फोन २एची जाहिरात आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. (Nothing Phone (2a))
Fresh. Eyes.
The official Phone (2a) launch event is happening on 5 March 2024, 11:30 GMT. pic.twitter.com/eE6hPjXOeB
— Nothing (@nothing) February 13, 2024
(हेही वाचा – Sandeshkhali Violence : उच्च न्यायालयाने फाटकारल्यावर ममता बॅनर्जींचे सरकार म्हणाले, शाहजहानला ७ दिवसांत पकडू)
नथिंग फोन ‘या’ प्रणालीवर आधारित
हा फोन रेडमी नोट १३ प्रोच्या जवळ जाणारा असेल. यात मीडियाटेक ७२०० चिपसेट आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला फोन ३०,००० रुपयांपर्यंत आणि १२ जीबी रॅम तसंच ५१२ जीबी स्टोरेज असलेला फोन ३५,००० रुपयांना मिळेल. या फोनचा डिस्प्ले ६.७ इंचांचा ओमेल्ड डिस्प्ले असेल. आणि त्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ इतका आहे. या फोनमधील प्राथमिक कॅमेरा ५० मेगा पिक्सेलचा आहे. तर अल्ट्रा वाईड लेन्सही ५० मेगा पिक्सलची आहे. सेल्फी कॅमेरा ३२ मेगा पिक्सलचा आहे. (Nothing Phone (2a))
नथिंग फोन हा त्यांच्या नथिंग ओएस २.५ या प्रणालीवर आधारित आहे. अँड्रॉईड १४ प्रणालीवर चालणाऱ्या या फोनबरोबर ४५ वॅटचं फास्ट चार्जिंग युनिटही मिळणार आहे. या फोनची स्पर्धा भारतात रेडमी नोट प्रो आणि रिअलमी नोट १२ प्रो या फोनबरोबर असेल. (Nothing Phone (2a))
हेही पहा –
Join Our WhatsApp Community