Nothing Phone (2a) : नथिंग फोन (२ए) भारतात मिळणार २३,९०० रुपयांपासून 

Nothing Phone (2a) : संस्थापक कार्ल पाय यांनी आधीच्या फोनपेक्षा नवीन फोनची किंमत कमी ठेवण्याची परंपरा यावेळीही पाळली आहे 

219
Nothing Phone (2a) : नथिंग फोन (२ए) भारतात मिळणार २३,९०० रुपयांपासून 
Nothing Phone (2a) : नथिंग फोन (२ए) भारतात मिळणार २३,९०० रुपयांपासून 
  • ऋजुता लुकतुके

प्रत्येक इलेक्ट्रिकल उत्पादन आणि आधुनिक वाहनांची पुढची पिढी लाँच होते तेव्हा किमती साधारणपणे आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त असतात. सुविधाही जास्त आणि आधुनिक असतात. नथिंग या फोनच्या बाबतीत मात्र संस्थापक कार्ल पाय यांनी वेगळाच पवित्रा घेतला आहे. आधीच्या फोनच्या तुलनेत ते पुढील प्रत्येक मॉडेलची किंमत कमी करणार आहेत. (Nothing Phone (2a))

(हेही वाचा- Border-Gavaskar Trophy 2024 : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पर्थ कसोटीने )

२६  मार्चला नथिंग फोन २ए (Nothing Phone (2a)) भारतात लाँच झाला आहे. तो नथिंग फोन १ पेक्षा किमतीने अर्थातच कमी आहे. कार्ल पाय यांनी यावेळी भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठीच अलीकडे आपल्या ट्विटर खात्यावर त्यांनी आपलं नाव बदलून कार्ल ‘भाई’ केलं आहे. इतकंच नाही तर नथिंगचे पुढील फोन भारतात तयार होतील, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. नवीन फोनचं डिझाईन कलात्मक पद्धतीने करण्यात आलं आहे. फोनच्या कॅमेरात आमूलाग्र सुधारणा केल्याचा दावा संस्थापक पाय यांनी केला आहे. तसंच आधीच्या फोनमध्ये असलेले ‘हॅलो गुगल’ सारखे फिचरही अधिक बिनचूक केले आहेत. (Nothing Phone (2a))

(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीने जेव्हा घरच्यांना मैदानातून व्हीडिओ कॉल केला )

हा फोन रेडमी नोट १३ प्रोच्या जवळ जाणारा असेल. यात मीडियाटेक ७२०० चिपसेट आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला फोन २३,९०० रुपयांपासून सुरू होतोय. १२ जीबी रॅम तसंच ५१२ जीबी स्टोरेज असलेला फोन २९,९०० रुपयांना मिळेल. या फोनचा डिस्प्ले ६.७ इंचांचा ओमेल्ड डिस्प्ले असेल. त्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ इतका आहे. या फोनमधील प्राथमिक कॅमेरा ५० मेगा पिक्सेलचा आहे. तर अल्ट्रा वाईड लेन्सही ५० मेगा पिक्सलची आहे. सेल्फी कॅमेरा ३२ मेगा पिक्सलचा आहे. (Nothing Phone (2a))

(हेही वाचा- Prakash Ambedkar : वंचितची पहिली उमेदवार यादी; मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी?)

नथिंग फोन (Nothing Phone (2a)) हा त्यांच्या नथिंग ओएस २.५ या प्रणालीवर आधारित आहे. अँड्रॉईड १४ प्रणालीवर चालणाऱ्या या फोनबरोबर ४५ वॅटचं फास्ट चार्जिंग युनिटही मिळणार आहे. चार्जिंग युनिट बाजारात उपलब्ध इतर चार्जरबरोबर कम्पॅटिबल असेल याची दक्षता यावेळी घेण्यात आली आहे. या फोनची स्पर्धा भारतात रेडमी नोट प्रो (Redmi Note Pro) आणि रिअलमी नोट १२ प्रो (Redmi Note Pro 12) या फोनबरोबर असेल. (Nothing Phone (2a))

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.