वन प्लसचे (OnePlus) सह-संस्थापक कार्ल पेई यांनी ‘नथिंग’ हा नवा स्टार्टअप सुरू केला. हीच कंपनी ‘नथिंग’ हा आपला पहिला स्मार्टफोन एप्रिलमध्ये लॉंच करणार आहे. वन प्लसने ओपोशी (OPPO) हातमिळवणी केल्यावर वन प्लस प्रेमी काहीसे नाराज होते. म्हणून वन प्लसच्या कार्ल पेई यांनी नवीन स्टार्टअप कंपनी सुरू केली.
( हेही वाचा : यंदा मनसोक्त मारा ‘हापूस’ वर ताव! )
एप्रिलमध्ये लॉंंच होण्याची शक्यता
ही कंपनी जवळजवळ एक वर्षापासून आपल्या पहिल्या स्मार्टफोनवर काम करत आहे आणि ही कंपनी एप्रिलमध्ये या नव्या मोबाईलची घोषणा करण्याची योजना आखत आहे. नथिंग स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, माहिती कंपनीने अद्याप उघड केलेली नाहीत. माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये पारदर्शकतेवर (Transparency) लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.
This is it. It’s now official. 🚨
This summer we will be launching our first ever smartphone – phone (1). 📱
While it is going to be unlike anything you have seen, and I am super excited about it, this is just the start of the Nothing story. 👇 pic.twitter.com/5CGKf3sNkl
— Carl Pei (@getpeid) March 23, 2022
- नथिंग मोबाईल फोन उन्हाळ्यात मध्ये लॉंच केला जाईल.
- नथिंग या फोनसाठी स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टम आणि OS लाँच करणार आहे.
- आमचा OSअधिक वेगवान आणि स्मूद असेल असा दावा नथिंग कंपनीने केला आहे. तसेच या फोनमध्ये अॅप्स ओपन
- आणि बंज करण्याची गती सुपरफास्ट असेल.
- नथिंग फोनला 3 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि 4 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.
- या फोनच्या किंमतीबाबत कंपनीकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही.