सध्या देशात अशी परिस्थिती आहे की महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधनापासून किराणा मालापर्यंत सगळे काही महाग झाले आहे. महिला वर्ग आधीच या महागाईमुळे हैराण आहेत. पण त्यातच आता आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे सौंदर्य प्रसाधनांची. गेल्या काही दिवसांत सौंदर्य प्रसाधनांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे महिला वर्गात नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळत आहे.
20 ते 25 टक्क्यांनी वाढ
ही महागाई आता महिलांच्या सुंदर दिसण्यावरही आडकाठी घालणार आहे. मेकअपच्या साहित्यामध्ये गेल्या काही दिवसांत तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महिला सध्या नाराज आहेत. आधीच महागाईमुळे बजेट कोलमडले असताना, आता सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूही महाग झाल्याने अधिक काटकसर करावी लागणार आहे.
महिन्याला वाढताहेत दर
विशेष म्हणजे लग्नसराई आणि ऐन सण समारंभांच्या काळात सौंदर्य प्रसाधने महाग झाली आहेत. त्यात अनेक नामांकित उत्पादनांचा समावेश आहे. मेकअपमधील पावडर, लिप्सस्टिक, फाऊंडेशन यांवर 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याला हे दर वाढत आहेत.
( हेही वाचा: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डीएनए चाचणीच्या मदतीने देण्यात आला एका बलात्कार पीडितेला न्याय! )
व्यावसायिकही नाराज
सौंदर्यप्रसाधनांच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने, सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणा-या व्यावसायिकांमध्येही नाराजी आहे. मेकअपचे साहित्य महाग झाल्याने महिला आता फारश्या वळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आधी येणा-या ग्राहकांच्या तुलनेत आता केवळ 50 टक्के क्षमतेनेच ग्राहक येत असल्याची तक्रार व्यवसायिक करत आहेत.
Join Our WhatsApp Community