मुंबईच्या किना-यालगत आलेल्या दुर्मिळ मासा मोठ्या संख्येनं मच्छिमारांच्या जाळ्यात अडकलाय. तब्बल ४०० किलोच्या वजनात हा ससाच्या तोंडासारखा मासा मिळाल्यानं मुंबईचे मच्छिमारही आश्चर्यचकित झालेत. रेटीक्युलेट युनिकोर्न मासा असं या मासाचं नाव आहे. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या संख्येनं हा मासा आढळल्यानं माशावर ताव मारण्यासाठी खवय्ये पुढे येत नसल्यानं मच्छिमाराला मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होतेय.
शनिवारी मोठ्या संख्येनं रेटीक्युलेटेट युनिकोर्न मासा ससून डॉकवर आढळून आला. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारी केल्यानं हा मासा मोठ्या संख्येनं आढळून आल्याची माहिती समुद्रीजीव अभ्यासक स्वप्नील तांडेल यांनी दिली आहे. स्थलांतरामुळे हा मासा पश्चिम किनारपट्टीवर आल्याचा अंदाज तांडेल यांनी व्यक्त केला. रेटीक्युलेटेड युनिकोर्न मासा सतत आढळल्यास अभ्यासानंतरच योग्य निष्कर्ष मांडता येईल, असंही तांडेल यांनी स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचा – तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव)
मात्र कोणत्या मच्छिमाराच्या जाळ्यात एवढ्या संख्येनं हा मासा सापडला ही माहिती समजू शकली नाही. याआधी पंधरा दिवसांपूर्वीही मुंबईतील एका मच्छिमाराच्या जाळ्यात हा मासा थोड्यासंख्येनं आढळून आला होता. शनिवारी मात्र ससून डॉकवर ४०० किलो वजनासह मोठ्या संख्येनं मिळालेल्या कोणीही विक्रीसाठी घेतलेलं नाहीय. संबंधित मच्छिमाराला गिऱ्हाईक न मिळाल्यास तब्बल ८० हजारांचा फटका बसण्याची भीती आहे.
रेटीक्युलेटेड युनिकॉर्न माशाबद्दल
- हा मासा मुळात थायलंडला आढळतो. २००१ साली थायलंडमध्येही ही माशाची प्रजाती आढळून आली.
- हा मासा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर याआधीही आढळला आहे. गुजरात किनारपट्टीवर २०१६ साली तर केरळ किनारपट्टीवर हा एकच मासा आढळला.
- तोंडाचा आकार सशाच्यासारखा असल्यानं त्याला सशासारख्या दिसणा-या माशाच्या वर्गवारीत मोडले जाते.
शारिरीक, मानसिक आरोग्यासाठी गुणकारी मासा
हा मासा वेगवेगळ्या जीवनसत्त्वांचा प्रमुख स्त्रोत आहे. बी ३, बी १२ सह फॉस्फरस, पोटेशिअम, सेलेनियमचं प्रमुख स्त्रोत हा मासा खाल्ल्यानं मिळू शकतं. शिवाय फॅटी एसिड आणि ओमागा ३ सुद्धा हा मासा खाणा-या खवय्यांना मिळेल. हृदयविकार, संधीवाताच्या रुग्णांना हा मासा लाभदायक ठरले. शिवाय डिप्रेशनसारख्या मानसिक आजारावरही मात करायला मदत होईल.