Indian Post : आता पोस्टाद्वारे करता येणार ऑनलाईन खरेदी!

97

सणासुदीच्या काळात अलिकडे आपण Amazon, flipkart या शॉपिंग वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करतो. तुम्ही सुद्धा ऑनलाईन खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण आता तुम्ही इंडिया पोस्टच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन खरेदी करू शकता. इंडिया पोस्टनेही आपलं ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले आहे.

( हेही वाचा : ‘यात्री’ मोबाइल ॲपवर मिळणार मुंबईतील सर्व लोकल ट्रेनचे अपडेट)

पोस्टाचे नेटवर्क हे विश्वसनीय आणि भारतभर पसरलेले आहे त्यामुळे याचा नागरिकांना नक्कीच फायदा होईल. या नव्या योजनेमुळे पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना लहान गोष्टींसाठी पोस्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, कारण आता इंडिया पोस्ट Amazon आणि flipkart प्रमाणे होम डिलिव्हरी करणार आहे.

तुम्ही इंडिया पोस्टवरून काय काय मागवू शकता?

ग्राहकांना घरबसल्या इंडिया पोस्टच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. सर्व वस्तूंची डिलिव्हरी थेट लोकांच्या घरापर्यंत करता येईल. इंडिया पोस्टच्या ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे खरेदी केलेला माल पोस्टमनद्वारे भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील, ग्रामीण भागातीस कोणत्याही नागरिकांपर्यंत पोहोचवला जाईल. या माध्यमातून तुम्ही कपडे, भारतीय पोस्ट उत्पादने, बांगड्या, गिफ्ट, घरगुती उपकरणे व वस्तूंची खरेदी करू शकता.

या सेवेचा लाभ कसा घ्याल?

  • सर्वप्रथम इंडिया पोस्ट Ecom.Indiapost.Gov.In च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • यानंतर होमपेजवर माय अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला Existing User आणि New user असे दोन पर्याय दिसतील.
  • रजिस्ट्रेशन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणी केल्यावर तुम्हाला वैयक्तिक माहिती, पत्ता, पिनकोड समाविष्ट करावा लागेल. माहिती सेव्ह झाल्यावर तुम्हाला नवीन यूजर आयडी पासवर्ड मिळेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.