आता QR कोडद्वारे शेअर करा इंस्टाग्राम पोस्ट आणि Reels

103

इंस्टाग्रामवर आता लवकरच नवे फिचर येणार आहे. इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्या युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: तरूणाईमध्ये इंस्टाग्राम रिल्सची क्रेझ आहे. यासाठी इंस्टाग्राम सतत नवनवे फिचर रोलआऊट करत असते. इंस्टाग्राम आता पोस्ट आणि रिल्ससाठी क्यूआर कोड फिचर आणण्याच्या तयारीत आहे. पोस्ट, रिल्स, टॅग आणि लोकेशन शेअरिंगसाठी तुम्ही क्यूआर कोड वापरू शकता.

( हेही वाचा : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! १ ऑक्टोबरपासून एसी लोकलच्या ३१ फेऱ्या वाढणार )

क्यूआर कोड पर्यायाद्वारे कसे शेअर करणार पोस्ट आणि Reels?

इंस्टाग्रामवरील युजर्ससाठी आता क्यूआर कोड शेअरिंग पर्याय उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला फक्त कोणत्याही रिल्स, पोस्ट किंवा लोकेशनवरील थ्री-डॉट मेन्यूवर क्लिक करा. यामध्ये वरच्या बाजूला उजवीकडे क्यूआर कोड ऑप्शनवर क्लिक करा तुम्ही आता क्यूआर कोड कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करू शकता.

इंस्टाग्रामच्या या नव्या फिचरमुळे युजर्सला क्यूआरद्वारे प्रोफाइल शेअर करण्याची परवानगी मिळेल. याशिवाय तुम्हाला तुमच्या रिल्स, लोकेशन किंवा पोस्ट क्यूआर कोडमुळे शेअर करणे सोपे होईल असे इंस्टाग्रामने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.