आता फक्त तीन दिवसांत मिळेल पासपोर्ट, नियमांत झाला बदल

परदेशी जायचं असेल किंवा अधिकृत कागदपत्र म्हणून भारतीय पासपोर्ट हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. पण समजा तातडीने बाहेरगावी जायची वेळ आली आणि जर पासपोर्ट नसेल तर मोठी पंचाईत होते. पण आता पासपोर्ट सेवेत भारत सरकारकडून काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामुळे लोकांना झटपट पासपोर्ट मिळणे सोपे होणार आहे.

तीन दिवसांत येणार पासपोर्ट

ऑनलाईन पासपोर्ट मिळवण्यासाठी Passport Seva वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरताना जर तातडीने पासपोर्ट हवा असेल तर तत्काळ पासपोर्ट(Tatkaal Passport) हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. असा तत्काळ पासपोर्ट मिळवण्यासाठी आता फक्त तीन दिवस वाट बघावी लागणार आहे. या तत्काळ पासपोर्टचे पोलिस व्हेरिफिकेशनही अतिशय वेगाने केलं जातं. त्यामुळे केवळ तीन दिवसांत पासपोर्ट तुमच्या घरी पोहोचणार आहे.

असे करा अप्लाय

https://portal2.passportindia.gov.in/AppOnlineProject/user/RegistrationBaseAction या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन पासपोर्टसाठी अप्लाय करता येईल. त्यानंतर ऑनलाईन पासपोर्टसाठी शुल्क आकारण्यात येईल. साध्या पासपोर्टसाठी दीड हजार रुपये तर 60 पानांच्या पासपोर्टसाठी 2 हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. साध्या पासपोर्टसाठी 30 दिवसांचा कालावधी लागतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here