आता मोबाईल नेटवर्क नसतानाही करू शकता Call, फोनमधील ‘या’ सेटिंग्ज बदला

142

आपल्याला महत्वाचा फोन करायचा असेल आणि नेमके मोबाईलचे नेटवर्कच नसेल अशावेळी मोठी समस्या निर्माण होते. ग्रामीण भागात तर सहसा नेटवर्क नसतेच परंतु अनेकवेळा शहरी भागात सुद्धा अशी समस्या उद्भवते. अशावेळी समाजमाध्यमांवरून व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. परंतु समोरच्या व्यक्तीचे नेट सुरू असेल की नाही याचीही शाश्वती नसते, अशावेळी तुम्ही काय कराल? आपल्या फोनमध्ये एक खास फिचर आहे, ज्याद्वारे मोबाईल नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करू शकता. याविषयी आपण जाणून घेऊया…

( हेही वाचा : ‘तारीख ठरली’ राज्यात १५ हजार जागांसाठी पोलीस भरती! )

WiFi कॉलिंग फिचर

WiFi कॉलिंग फिचरच्या मदतीने मोबाइल नेटवर्क नसतानाही तुम्ही सहज कोणालाही कॉल करू शकता. या फिचरला अ‍ॅक्टिव्ह करून तुम्ही सहज नेटवर्कशिवाय कोणत्याही मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांशी बोलू शकता. यासाठी तुम्ही WiFi नेटवर्कशी कनेक्ट असणे महत्वाचे आहे.

Android युजर्ससाठी 

  • फोनच्या सेटिंग्जमधून WiFi पर्याय निवडा.
  • यावर क्लिक करून तुम्हाला WiFi कॉलिंगचा पर्याय दिसेल.
  • या फिचरला ऑन करून तुम्ही नेटवर्कशिवाय फोन लावू शकता.

iPhone युजर्ससाठी

तुम्ही आयफोन युजर्स असला तर सेटिंग्जमधील मोबाईल डेटा पर्यायावर क्लिक करून तुम्हाला WiFi कॉलिंगचा पर्याय दिसेल. त्यानंतर WiFi calling on this iPhone या पर्यायावर क्लिक करा. यामुळे आयफोनमध्ये WiFi कॉलिंग हे अ‍ॅक्टिव्ह होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.