जगभरातील जवळपास दोन अब्ज युजर्स दर दिवशी संभाषणासाठी व्हॉट्सॲपचा वापर करतात. या प्लॅटफॉर्मवर दररोज १०० अब्जाहून अधिक मेसेजेसची देवाणघेवाण होते. जगभरातील एकूण युजर्सपैकी सर्वांत जास्त युजर्स हे भारतीय आहेत. लोकांच्या पसंतीचे हे अॅप सतत काही ना काही अपडेट्स घेऊन येत असते. व्हॉट्सॲप बीटा इन्फोने दिलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच एक खास फिचर घेऊन येणार आहे.
सगळ्यांची डोकेदुखी
कधी बोलताना, कधी जेवताना तर कधी चालताना युजर्स मेसेज टाईप करतात. मात्र घाईघाईत टाईप केलेल्या या मेसेजमध्ये अनेक चुका राहातात. एखाद्या ग्रुपमध्ये मराठी किंवा इंग्रजी भाषेतून पाठवलेल्या मेसेजमध्ये शुद्धलेखनाची चूक झाली तर तोंड लपवण्याची वेळ येते. तेव्हा चूक असलेला मेसेज डिलीट करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा नवीन मेसेज टाकावा लागतो.
समस्या कायमची सुटणार
लवकरच एक विशेष फिचर येणार आहे. ज्यामुळे ही समस्या कायमची सुटणार आहे. व्हॉट्सॲप बीटाइन्फोने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्या रिपार्टनुसार आता सेंट झालेल्या मेसेजला एडिट करणे शक्य होणर आहे.
(हेही वाचा ‘द केरळ स्टोरी’ धर्मांतरासाठी मुसलमानांची टूलकिट)
तीन डॉट्समध्ये लपणार
पाठवलेला मेसेज एडिट करण्याचा पर्याय सहज दिसेल अशा ठिकाणी असणार आहे. मेसेज सिलेक्ट केल्यावर तो कॉपी किंवा रिपार्ट करण्याचा पर्याय दिसतो. तिथेच हा नवीन पर्याय दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
बंधन स्वीकारून
सेंट केलेला मेसेज एडिट करता येणे हे एक आवश्यक फिचर आहे. याचा वापर प्रत्यके दिवशी करता येईल. पाठवलेला कोणताही मेसेज एडिट करता येत असला तरी त्यावर दोन बंधने आहेत. एक म्हणजे पाठवलेला मेसेज फक्त १५ मिनिटांपर्यंत एडिट करता येईल. दुसरी गोष्ट जो मेसेज एडिट केलेला असेल तिथे ‘एडिटेड’ असे लेबल लावलेले पाहायला मिळेल.
वापरून पाहायचे आहे?
या उपयोगी फिचरच्या प्रतीक्षेत अनेक युजर्स आहेत. मात्र याचा वापर लगेच करता येणार नाही. हे वापरून पाहाण्यासाठी किती वेळ थांबावे लागेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Join Our WhatsApp Community