घरबसल्या तुम्ही मिळवा तुमच्या मोबाईलचे सिमकार्ड! कसे ते वाचा…

केंद्र सरकारने या नियमावलीत बदल केला आहे.

93

कालपर्यंत मोबाईल नंबर बदलायचा असेल, नवीन नंबरचे सिमकार्ड घ्यायचे अथवा पोस्टपेड प्रीपेड यांच्यात रूपांतर करायचे यांसारख्या गोष्टींसाठी थेट मोबाईलचे दुकान गाठावे लागायचे, मात्र आता याची गरज भासणार नाही, कारण केंद्र सरकारने या नियमावलीत बदल केला आहे. त्यामध्ये यापुढे आता घरबसल्या या सर्व सुविधा मिळवता येऊ शकणार आहेत.

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता नवीन सिम कनेक्शन मिळवण्यासाठी किंवा प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये रुपांतरित करण्यासाठी फिजिकल फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. दूरसंचार कंपन्या डिजिटल माध्यमातून हा फॉर्म भरू शकतील. सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे. आतापासून जर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर किंवा टेलिफोन कनेक्शन घ्यायचे असेल, तर तुमचे केवायसी पूर्णपणे डिजिटल होईल.

(हेही वाचा : कोरोनानंतर चीनचा हा आहे नवा गेम…)

काय होणार या निर्णयामुळे?

  • केवायसीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्र सादर करावी लागणार नाहीत.
  • पोस्टपेड सिमला प्रीपेड करण्यासारख्या सर्व कामासाठी कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही.
  • केवायसाठी केवळ १ रुपया भरावा लागेल.
  • प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलण्यासाठी केवायसी फक्त एकदाच करावी लागणार

अशी करा ऑनलाईन केवायसी!

  • केवायसीसाठी कागदपत्रे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वेबसाइट किंवा अॅप्लिकेशनद्वारे केले जाऊ शकते.
  • यासाठी सर्वप्रथम सिम प्रदात्याचे अॅप्लिकेशन फोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल.
  • यानंतर, आपल्याला आपल्या फोनवर नोंदणी करावी लागेल आणि पर्यायी क्रमांक द्यावा लागेल, जो आपल्या ओळखीच्या व्यक्तीचाही असू शकतो.
  • यानंतर तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
  • यानंतर तुम्हाला लॉग इन करून सेल्फ केवायसीचा पर्याय निवडावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही विनंती केलेली माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.