आता ओला ड्रायव्हरला सांगावं लागणार नाही तुमचं डेस्टिनेशन

121

प्रत्येकालाच हा अनुभव आला असेल की, ओला बुक केल्यानंतर ओला ड्रायव्हरला आपले डेस्टिनेशन लोकेशनवर जाणे जमणार नसेल, तर तो राईड रद्द करतो. ओलाच्या बाबतीत राईड रद्द होत असल्याचे सातत्याने समोर येत असल्याने, ओलाचे सह -संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विट करुन या समस्येवर तोडगा काढण्यात आल्याचे सांगितले आहे.

म्हणून घेतला निर्णय

ओलाने अधिकृतरित्या ट्विट करुन मंगळवारी सांगितले की, त्यांचे ड्रायव्हर पार्टनर आता राइड सुरू करण्यापूर्वीच आपल्या मोबाइल फोनवर प्रवाशांना कुठे जायचे आहे आणि ते रोख किंवा ऑनलाइनद्वारे पेमेंट करणार आहेत, हे पाहण्यास सक्षम असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एका ट्विटमध्ये ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल म्हणाले की, ड्रायव्हरद्वारे राइड रद्द करणे, ही या संपूर्ण मोबाइल अॅप आधारित व्यवसायाची मोठी समस्या आहे. कंपनीला ते बंद करायचे आहे. दरम्यान, कंपनीच्या या निर्णयानंतर याचा फायदा असा होणार आहे की, जर कोणत्याही कॅब ड्रायव्हरला राइड रद्द करायची असेल तर तो लगेचच करेल. त्यामुळे प्रवाशांना थांबावे लागणार नाही आणि त्यांचा वेळही वाचेल. बऱ्याचदा ओला कॅब किंवा बाईक बुक करणाऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागतो.

कॅब ड्रायव्हर्सच्याही सोयीचे

अनेक वेळा बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर कॅब ड्रायव्हर प्रवाशाला पिकअप स्थानावर पोहोचण्यापूर्वी कॉल करतात आणि त्यांना कुठे जायचे आहे आणि पेमेंट रोख किंवा ऑनलाइन मिळेल, याबाबत विचारतात. यानंतर प्रवासी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न मिळाल्यास कॅब ड्रायव्हर डेस्टिनेशन जाण्यास नकार देतात आणि राईड रद्द करतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा प्रवाशांचे मोठे नुकसान होते. प्रवाशांना आपल्या डेस्टिनेशनवर वेळेवर पोहोचता येत नाही. कॅब ड्रायव्हर्सनाही याचा फायदा होईल, जर एखाद्या ठिकाणी जाणे त्यांच्यासाठी सोयीचे नसेल तर ते राइड रद्द करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.