-
ऋजुता लुकतुके
एनटीपीसी अर्थात, नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेड कंपनीची एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही उपकंपनी आहे. केंद्र सरकारने पवन व सौर ऊर्जेला महत्त्व देण्याचं ठरवल्यावर अशा क्षेत्रातील कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत. प्रकल्प उभारणीसाठी केंद्राकडून अनुदान व इतर मदतही मिळत आहे. जागतिक स्तरावर २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा नारा देण्यात आला आहे आणि भारतही या चळवळीचा भाग आहे. २०३० पर्यंत भारताला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांतून ४५० गिगावॅट इतकी ऊर्जा मिळवायची आहे. (NTPC Green Energy Share Price)
या क्षेत्रातील एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही एक मोठी कंपनी आहे. कंपनीने २०३८ पर्यंत ६० गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानातील गुंतवणूक कंपनी करत आहे. पण, या कंपनीचा शेअर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जोरदार पडला होता. एकाच दिवशी २४ फेब्रुवारीला शेअर ६ टक्क्यांनी खाली आला. कारण, आयपीओ बाजारात आणताना कंपनीने ३ महिन्यांचा लॉक-इन कालावधी दिला होता. या कालावधीत शेअर विकण्याची परवानगी नव्हती. पण, २४ फेब्रुवारी २०२५ ला हा कालावधी संपल्यावर ज्यांनी अल्पावधीसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी ती काढून घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे शेअर खाली आला. त्यानंतर मात्र मार्च महिन्यात शेअर पुन्हा सावरला आहे आणि शुक्रवारी (२१ मार्च) शेअर बाजार बंद होताना ३.३६ टक्क्यांच्या वाढीसह १०२ रुपयांवर बंद झाला आहे. (NTPC Green Energy Share Price)
(हेही वाचा – Fraud : अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या सत्य प्रतिज्ञापत्रावर बनावट स्वाक्षरी; गुन्हा दाखल)
एनटीपीसी या मुख्य कंपनीकडे ग्रीन एनर्जी या उपकंपनीची ८९ टक्के हिस्सेदारी आहे. आयपीओच्या माध्यामातून कंपनीने बाहेरून पैसे उभे करण्याचं ठरवलं आहे. पण, लॉक-इन कालावधी नुकताच संपल्यानंतर विक्रीचा जोर काही काळ वाढला आहे. शिवाय जानेवारी २०२५ पासून भारतीय शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरची मागणी कमी झाली आहे. त्याचाही फटका नजीकच्या काळात शेअरला बसू शकतो. (NTPC Green Energy Share Price)
पण, एरवी कंपनीची कामगिरी आणि पुढील वाटचाल आश्वासक आहे. कंपनीच्या विस्ताराच्या योजनाही तयार आहेत. कारण, ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी प्रकल्पांची संख्या वाढणं आवश्यक आहे आणि त्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरचा ५२ आठवड्यातील उच्चांक १५५ चा आहे. डिसेंबर २०२४ मध्ये तो नोंदवला आहे. तर फेब्रुवारी २०२५ मध्ये कंपनीने ९६.२ चा नीच्चांकही नोंदवला आहे. (NTPC Green Energy Share Price)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमधील खरेदी – विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community