बदलत्या हवामानानुसार लोकांची दिनचर्या सुद्धा बदलत असते. यानुसारच आपण दररोजचा आहार प्लॅन करणे आवश्यक असते. अनेक पोषणतज्ञ खास हिवाळ्यात शरीराची काळजी कशी घ्याल याचे मार्गदर्शन करत, पोषक आहाराची माहिती देतात. यासंदर्भात सेलिब्रिटी डायटेशिएन रुजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर हिवाळ्यातील जेवणाचा प्लॅन शेअर केला आहे.
हिवाळ्यात आठवड्याचा आहार दिनक्रम
- सोमवारसाठी, पोहे हा एक जलद आणि सोपा नाश्ता आहे. तर, दुपारच्या जेवणासाठी पनीर आणि भात, रात्रीच्या जेवणासाठी चिकन आणि भात यांचा समावेश आपण करू शकतो.
( हेही वाचा : कोरोनाचा मंत्र्यांना विळखा! मागील आठवडाभरात किती मंत्र्यांना झाली लागण? )
- मंगळवारी शेवया उपमा, आलू कोबी आणि बाजरीची रोटी आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी खिचडीचा पर्याय असू शकतो.
- गुरुवारसाठी, रताळ्याचे पदार्ख नाश्त्याच्या मेनूमध्ये समाविष्ट केले पाहिजे. आलू (बटाटा), पालक (पालक) भात, चपाती भाजी हा पर्याय दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी उत्तम आहे.
- शुक्रवारी लसणाच्या चटणीसोबत पांढरा ढोकळा हा एक प्रकारचा नाश्ता तुम्ही ट्राय करू शकता. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी मूळ्याची भाजी, गहू किंवा मकई (कॉर्नफ्लोअर) रोटी आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी कुलथी सूप आणि बटर टोस्ट.
- आठवड्याच्या शेवटी तुम्ही पराठा, इडली या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
- हिवाळ्यातील फळे सीताफळ, पेरू, बेर, सफरचंद इत्यादींचे भरपूर सेवन करा. हिवाळ्यात कोरडेपणा दूर करण्यासाठी उसाचा रस, निंबू सरबत, लस्सी सेवन करत हायड्रेटेड रहा. असेही दिवेकर यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार, प्रदेशानुसार यातील पदार्थांचा आहारात समावेश करा असेही त्यांनी नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community
View this post on Instagram