…तर स्थूलतेवर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही !

पूर्वीच्या काळात साठीपार रुग्णांमध्ये स्थूलपणा आढळून यायचा, गेल्या काही वर्षांत स्थूलपणा हा चाळीशीत पोहोचलेल्या रुग्णांमध्ये आणि आता पिझ्झा, बर्गर, समोसा अशा जंकफूडवरच जगणा-या रुग्णांमध्ये विशीच्या आतच स्थूलपणाच्या समस्या दिसून येत आहे, अशी माहिती बॅरिएट्रीक सर्जन डॉक्टर जयश्री तोडकर यांनी दिली. स्थूलपणा आणि मधुमेह हे दोन्ही आजार असणारे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, असेही डॉक्टर तोडकर यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅडोलसन्स बॅरिएट्रीकशिवाय पर्याय नाही

मुलांमध्ये आता शारिरीक हालचाल खूपच मंदावली आहे. त्यात चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लहान वयातच दिसणा-या आजारांची लक्षणं पालकांनी त्वरित ओळखायला हवी. तरुण वयात मोठ्या आजारांमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत आहे. हे आजार अचानक होत नसून, शरीर याबाबत पूर्वसूचना देत असते. असे संकेत वेळीच ओळखा, असे आवाहन डॉक्टर तोडकर यांनी केले आहे. गेल्या सतरा वर्षांच्या तुलनेत मागील पाच वर्ष पाहता स्थूलपणा सहज कमी न होणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. परंतु, स्थूलपणाचे उतरते वयोमान पाहता भविष्यात अॅडोलसन्स बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नाही, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

( हेही वाचा : अनुवंशिकता ठरतेय स्थूलतेला कारण, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत )

प्री-डिसीज म्हणजे काय ?

प्री डिसाज म्हणजे, मोठे आजार शरीरात बळावण्यापूर्वी शरीर किमान पाच वर्ष संकेत देत असतो. या संकेतांकडे कानाडोळा करु नये, असे आवाहन डॉक्टर तोडकर करतात. मुळात शरीरात कोणताही बिघाड जाणवला की त्वरित डॉक्टरांना सांगायला हवे, दुर्लक्ष करता कामा नये, असेही त्या म्हणाल्या.

स्थूलपणा टाळण्यासाठी हे करा

स्थूलपणा टाळण्यासाठी भूकेपेक्षा अतिरिक्त खाणे टाळा व दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. असा सल्ला डॉक्टर जयश्री तोडकर यांनी दिला आहे. हे मुख्य उपाय केल्यास स्थूलपणावर मात करू शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here