-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकाला या आठवड्यात सुरुवात होईल आणि स्पर्धेचं महत्त्व लक्षात घेता काही विक्रम नक्की नव्याने लिहिले जातील. नुकत्याच पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या मालिकेत जवळ जवळ ३५० धावांचाही यशस्वी पाठलाग झाला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकात धावांचा पाऊस पडेल हे नक्की आहे. अशावेळी षटकार आणि चौकारांची आतषबाजी पहायला मिळेल हे ही नक्की आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा नियम हा पाकिस्तानी फलंदाजाच्याच नावावर आहे. पाकचा माजी सलामीवीर शाहीद आफ्रिदीने ३६९ डावांमध्ये तब्बल ३५१ षटकार खेचले आहेत आणि सर्वाधिक षटकारांचा विक्रम आफ्रिदीच्याच नावावर आहे. (ODI Highest Sixes)
(हेही वाचा – Police : पोलिसांवरील ताण आणि त्यासाठी उपाय)
भारताचा हिटमॅन रोहित शर्मा हा दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितला हिटमॅन हे टोपणनाव पडलं ते त्याच्या मनाप्रमाणे षटकार ठोकता येण्याच्या सवयीमुळेच. टायमिंगचं नैसर्गिक वरदान त्याला लाभलंय आणि त्याच्या जोरावर फारशी ताकद न लावता तो षटकार मात्र लीलया मारतो. खासकरून हूक आणि पूलच्या फटक्यांवर त्याने वसूल केलेल्या षटकारांसाठी तो जास्त लोकप्रिय आहे. अगदी अलीकडे इंग्लंडविरुद्ध त्याने ९० चेंडूंत ११९ धावा केल्या त्यातही त्याने १३ षटकार ठोकले. एका डावातील हे सर्वाधिक षटकार आहेत आणि आता तो ख्रिस गेलला माग टाकून एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. तिसऱ्या क्रमांकावर अर्थातच ख्रिल गेल आहे. (ODI Highest Sixes)
MOST SIXES IN ODI :
351 – Shahid Afridi
338 – Rohit Sharma
331 – Chris Gayle
270 – S Jayasuriya
229 – MS DhoniRohit Sharma needs 13 More Sixes to become the No. 1 in Most Sixes in ODI. pic.twitter.com/MRyWZD3rED
— Vikas Yadav (@VikasYadav66200) February 11, 2025
शाहीद आफ्रिदीला षटकारांच्या बाबतीत मागे टाकण्यासाठी रोहितला आणखी १३ षटकारांची गरज आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील षटकारांची यादी पाहूया, (ODI Highest Sixes)
(हेही वाचा – thdc recruitment : निघाली आहे THDC भरती २०२५ ची अधिसूचना; त्वरा करा, आजच फॉर्म भरा…)
खेळाडू |
डाव |
एकूण धावा |
षटकार |
शाहीद आफ्रिदी |
३६९ |
८,०६४ |
३५१ |
रोहित शर्मा* |
१६० |
१०,९८८ |
३३८ |
ख्रिस गेल |
२९४ |
१०,४८० |
३३१ |
सनथ जयसूर्या |
४३३ |
१३,४३० |
२७० |
महेंद्रसिंग धोनी |
२९७ |
१०,७७३ |
२२९ |
सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत पहिल्या दहांत असलेला एकमेव रोहित शर्मा अजून खेळतोय. बाकी सगळे निवृत्त झाले आहेत. तर भारताकडून रोहित शर्माच्या खालोखाल महेंद्रसिंग धोनी (२२९), सचिन तेंडुलकर (१९५), सौरव गांगुली (१९०) आणि युवराज सिंग (१५५) यांचा षटकारांच्या बाबतीत क्रमांक लागतो. (ODI Highest Sixes)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community