जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी अनेक लोक आहारात चटणीचा समावेश करतात. भाकरी-चपाती सोबत प्रामुख्याने कांदा, टोमॅटोच्या चटणीच्या सेवन केले जाते. तर डोसा, ईडलीसोबत खोबऱ्याची चटणी खाल्ली जाते. भारतात अनेक प्रकारच्या चटण्यांचा आहारात समावेश केला जातो. परंतु तुम्हाला माहितीये का? भारतात असेही एक ठिकाण आहे ज्याठिकाणी मुंग्यांची चटणी जेवणासोबत खाल्ली जाते.
( हेही वाचा : अनेक सरकारी बॅंकांसाठी महत्त्वाची घोषणा; तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या सविस्तर)
लाल मुंग्यांची चटणी म्हणजे काय?
- ओडिशामधील मयूरभंज या गावातील लोक चक्क लाल मुंग्यांची चटणी खातात. झारखंडमधील मटरकुवा या गावातील रहिवासी सुद्धा अशाप्रकारच्या चटणीचा आहारात समावेश करतात. थंडीच्या दिवसात शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी अशाप्रकारच्या चटणीचे सेवन केले जाते.
- लाल मुंग्या आणि त्यांच्या अंड्यांपासून बनवलेली चटणी भारतातील छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये खाल्ली जाते.
- या मुंग्यांमध्ये (Red Ants) टेटरिक अॅसिडचे प्रमाण असते आणि यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. ओडिशा, छत्तीसगढ, झारखंड येथे ही चटणी आठवडी बाजारत फक्त १० रुपयांमध्ये विकली जाते. यामध्ये प्रोटिन्स, झिंक, कॅल्शियम आणि व्हिटामिन बी-१२ चे प्रमाण सर्वाधिक असते.
जीआय टॅगची मागणी
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात, लाल मुंग्यांची चटणी ‘काई चटणी’ म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि आता शास्त्रज्ञांनी यासाठी भौगोलिक संकेत अर्थात जीआय (GI) टॅगची मागणी केली आहे. काई चटणीला मान्यता मिळावी यासाठी संशोधकांनी आयुष मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. यामुळे भारताच्या या युनिक डिशला जागतिक दर्जा मिळेल.