कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यास घरच्या घरी अशी घ्या काळजी

बहुतेक लोक सांगितलेल्या उपायांचे पालन करत स्वत:ची काळजी घेऊन घरीच पूर्णतः संसर्ग-मुक्त होऊ शकतात.

79

भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने प्राप्त माहितीचा योग्यप्रकारे अभ्यास करुन कोविड-19ची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी होम केअर टिप्स जारी केल्या आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरच्या घरी योग्यप्रकारे काळजी घेऊन कोरोनावर मात करण्यास मदत होणार आहे.

कशी घ्याल प्राथमिक काळजी?

कोविड-19ची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाण्याचा सल्ला यात देण्यात आला आहे. कारण बहुतेक लोक सांगितलेल्या उपायांचे पालन करत स्वत:ची काळजी घेऊन घरीच पूर्णतः संसर्ग-मुक्त होऊ शकतात. यामध्ये रोगाच्या सामान्य लक्षणांची यादी देण्यात आली असून, व्यक्तीला कोणतेही पहिले लक्षण आढळून आल्यास त्याने घरातच एका वेगळ्या खोलीत राहून स्वत:ची काळजी घेण्यास सुरुवात करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. हा संसर्ग शरीराच्या नैसर्गिक प्रतिकार क्षमतेत अडथळा निर्माण करतो, पण लोकांनी काळजी करू नये किंवा घाबरुन जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

(हेही वाचाः लसीचा पहिला डोस घेतल्यावर कोरोना झाल्यास कधी घ्याल ‘दुसरा’ डोस? ‘एम्स’च्या तज्ज्ञांनी दिले उत्तर)

हे आहेत उपाय

  • वेगळे राहणे, विश्रांती घेणे आणि सतत पाणी किंवा द्रव पदार्थाचे सेवन करणे.
  • नियमितपणे रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी आणि शरीराच्या तापमानाचे निरीक्षण करणे.
  • ताप कायम राहिल्यास किंवा ऑक्सिजनची पातळी 92%च्या खाली आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे.
  • एसपीओ 2 पातळी 94% पेक्षा कमी झाल्यास फुफ्फुसातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी त्या व्यक्तीने कोणत्या स्थितीमध्ये झोपावे याचे देखील वर्णन यामध्ये केले आहे.
  • रुग्ण राहत असलेली खोली हवेशीर ठेवण्यासाठी त्या खोलीची दारे आणि खिडक्या खुल्या ठेवण्याचा महत्वपूर्ण सल्ला देखील यात देण्यात आला आहे.
  • विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण करण्याचे महत्त्व देखील या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.
  • लसीकरणानंतरही, कोविड योग्य वर्तनाचे अनुसरण करणे आवश्यक असल्याचे यामध्ये पुन्हा एकदा नमूद केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.