-
ऋजुता लुकतुके
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ही देशातील सगळ्यात मोठी सरकारी मालकीची तेल व नैसर्गिक वायू उत्पादन करणारी कंपनी आहे. देशातील तेल साठ्यांचा शोध आणि त्यांचं नियमन हे महत्त्वाचं कामही हीच कंपनी करते. देशातील ७० टक्क्यांच्या वर खनिज तेल उत्पादन हे या कंपनीकडे आहे. तर ८० टक्के नैसर्गिक वायू उत्पादनही ही कंपनी करते. १९५६ मध्ये जवाहरलाल नेहरू सरकारने या कंपनीची स्थापना केली होती. २०१० मध्ये कंपनीला महारत्न दर्जा मिळाला. पण, एवढीच या कंपनीची ओळख नाहीए. तर या घडीला ओएनजीसी ही देशातील सर्वाधिक नफा कमावणारी सरकारी कंपनी बनली आहे. (Oil And Natural Gas Corporation)
(हेही वाचा- नाशिकच्या Artillery Center स्फोट प्रकरणात ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश)
अर्थातच तेलाच्या किमतींमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली वाढ पाहता हे अपेक्षितच होतं. त्यातच ओेएनजीसी विदेश या परदेशातील तेल साठ्यांचं उत्खनन करणारी कंपनी स्थापन झाल्यापासून ओएनजीसीचा विस्तारही वाढला आहे. तेल उत्पादनही. ओएनजीसी विदेश ही पूर्णपणे ओएनजीसीच्या मालकीची उपकंपनी आहे. परदेशात तेल आणि नैसर्गिक वायू उत्खननाचं काम ही कंपनी करते. (Oil And Natural Gas Corporation)
रशिया – युक्रेन युद्ध आणि इस्त्रायल – इराण मधील कुरबुरी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढत आहेत. आणि त्याचा थेट फायदा या कंपनीला मिळताना दिसतोय. त्यामुळेच २०२४ सालाची सुरुवात झाल्यापासून हा शेअर भारतीय शेअर बाजारात जवळ जवळ ४५ टक्क्यांनी वर चढला आहे. आताही शुक्रवारी हा शेअर बंद होताना सव्वा टक्क्यांनी वाढून २९६.७ वर बंद झाला आहे. (Oil And Natural Gas Corporation)
शिवाय ओएनजीसी विदेश या परदेशात उत्खनन करणाऱ्या कंपनीला अझरबैजान जवळ कॅस्पियन समुद्रात मोठा तेल साठा सापडला आहे. आणि तिथे उत्खनन करण्याचं कंत्राटही मिळालं आहे. त्यानंतर मॉर्गन स्टॅनली या जगातील आघाडीच्या ब्रोकरेज कंपनीने ओएनजीसी शेअरचं वर्षभराचं लक्ष्य वाढवून ४३० रुपये केलं आहे. तर एमके इंटरनॅशन्सनेही ओएनजीसी खरेदी करण्याचा सल्ला देत लक्ष्य ३६० रुपये केलं आहे. आयसीआयसीआय सेक्युरिटीजच्या मते ओएनजीसी नजीकच्या काळात ३७५ रुपयांची मजल मारू शकतो. तर जीओजीत फायनान्शिअल सव्हिसेसनेही लक्ष्य ३२७ रुपये केलं आहे. (Oil And Natural Gas Corporation)
(हेही वाचा- Baba Siddique Shot Dead: … म्हणून Zeeshan Siddiqui थोडक्यात बचावले; काय घडलं निर्मलनगरच्या ऑफिसबाहेर?)
कंपनीचं भाग भांडवल ३.८५ लाख कोटी रुपये इतकं आहे. तर ५२ आठवड्यातील उच्चांक ३४५ रुपये इतका आहे. (Oil And Natural Gas Corporation)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. हिंदुस्थान पोस्ट शेअर बाजारातील खरेदी विक्रीसाठी थेट सल्ला देत नाही. गुंतवणूकदारांनी तज्जांच्या सल्ल्याने आणि स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी.)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community