दिल्ली जंक्शन रेल्वे स्थानक हे चांदनी चौक जुनी दिल्ली येथे स्थित आहे. हे दिल्लीतलं सर्वात जुनं रेल्वे स्थानक आहे. हे देशातल्या सर्वात व्यस्त असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकावरून दररोज सुमारे २५० गाड्यांची ये-जा सुरू असते. हे रेल्वे स्थानक १८६४ साली सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी इथे मूलतः कलकत्त्याहून येणाऱ्या ट्रेन्सची सर्व्हिस सुरू होती. (old delhi railway station)
लाल किल्ल्याच्या शैलीमध्ये डिझाईन केलेली सध्याच्या स्थानकाची ही इमारत ब्रिटिश सरकारने बांधली होती. दिल्ली जंक्शन हे भारताच्या रेल्वे नेटवर्कमधलं एक महत्त्वपूर्ण हब आहे. दिल्ली मेट्रो नेटवर्कचं चांदनी चौक हे स्थानक इथून जवळच आहे. या मेट्रो स्थानाकामुळे शहराला अखंड कनेक्टिव्हिटी प्राप्त झाली आहे. १८६४ साली कलकत्त्याहून ब्रॉड-गेज ट्रेनने या स्थानाकाचं काम सुरू झालं होतं. १८७३ साली राजपुताना राज्य रेल्वेने दिल्ली ते रेवाडी आणि पुढे अजमेरला जोडणारा एक मीटर-गेज ट्रॅक घातला. त्यानंतर १८७६ सालापासून या स्थानकावरून मीटर-गेज ट्रेन सेवा सुरू झाली. (old delhi railway station)
(हेही वाचा – Sydney Test : आकाशदीपला दुखापत, अंतिम अकराची निवड खेळपट्टी पाहिल्यावर – गौतम गंभीर )
१९३१ साली नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होण्यापूर्वी आणि १९२६ साली नवी दिल्ली रेल्वे स्थानकाची स्थापना होईपर्यंत जुनं दिल्ली रेल्वे स्थानक हे दिल्लीचं प्राथमिक रेल्वे स्थानक आणि चार रेल्वे मार्गांचं जंक्शन म्हणून कार्यरत होतं. मूळ आग्रा-दिल्ली रेल्वे मार्ग येथून गेला होता. हे क्षेत्र नंतर इंडिया गेट आणि राजपथ साठी नवी दिल्लीच्या शहर नियोजनाचा भाग म्हणून नियुक्त केलं गेलं. ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीने १९२४ साली नवीन मार्ग पूर्ण करून यमुना नदीच्या काठी ट्रॅक पुन्हा तयार केले. (old delhi railway station)
त्यानंतर १९३४-३५ साली स्टेशनचं रीमॉडेलिंग करण्यात आलं आणि स्थानकाचे प्लॅटफॉर्म वाढविण्यात आले. तसंच पॉवर सिग्नल सुरू करण्यात आलं. १९९० सालच्या दशकामध्ये स्थानकाच्या काश्मिरे गेटच्या बाजूला एक नवीन प्रवेशद्वार जोडण्यात आलं आणि अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधण्यात आले. सप्टेंबर २०११ साली प्लॅटफॉर्मचा पुन्हा नव्याने क्रम लावण्यात आला. मुख्य प्रवेशद्वारापासून प्लॅटफॉर्म क्रमांक १ असा क्रम सुरू झाला आणि काश्मिरे गेट प्रवेशद्वाराजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर पूर्ण झाला. तसंच २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी सक्षम असलेले मोठे प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी काही प्लॅटफॉर्म एकत्र केले गेले. (old delhi railway station)
(हेही वाचा – Boxing Day Test : भारताने मेलबर्न कसोटी का गमावली? शास्त्रींनी दिलं हे कारण)
पुढे २०१२-१३ साली रेल्वे स्थानकाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा दुसरा टप्पा पार पडला. २०१६ साली रेल्वे स्थानकावर २.२ मेगावॅट रुफटॉप सोलर प्रोजेक्ट स्थापित करण्याची योजना आखण्यात आली होती. या रेल्वे स्थानकाला आता १८ प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी २ प्लॅटफॉर्म हे २४ कोचच्या दोन ट्रेनच्या शेवटच्या टोकापर्यंत बसण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. गाड्या स्वच्छ करण्यासाठी हे स्थानक चार पिट लाइन्सने सुसज्ज केलेलं आहे. जवळच असलेल्या चांदनी चौक दिल्ली मेट्रो स्टेशनचं प्रवेशद्वार आणि निर्गमन आता दिल्ली जंक्शनच्या कंपाऊंडमध्ये आहे. भूमिगत वॉकवेच्या बांधकामामुळे मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी ५०० मीटर गजबजलेले रस्ते आणि गल्ल्यांमधून नेव्हिगेट करण्याची गरज भासत नाही. (old delhi railway station)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community