रंगाच्या उत्सवात पांढ-या रंगाचे कपडे का परिधान करतात ?

181

यंदाची होळी खास आहे. कारण, दोन वर्षांच्या निर्बंधानंतर आता निर्बंधमुक्त होळी खेळली जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या होळीसाठी लोक उत्साहात आहेत. होळी हा सण केवळ भारतातच नाही, तर विदेशातही जल्लोषात साजरा केला जातो. रंगाच्या या सणाला पांढ-या कपड्यांचे विशेष महत्व का आहे?  या सणाला  पांढ-या रंगाच्या कपड्यांना विशेष महत्त्व का दिले जाते ते जाणून घेऊया.

नेमकी धारणा काय?

आपण रंगपंचमीच्या दिवशी सर्वत्र पांढरे कपडे परिधान केलेले लोक पाहतो. आता फॅशन म्हणून रंगपंचमीला पांढ-या रंगांचे कपडे परिधान केले जातात. पण, पूर्वीच्या काळी या पांढ-या रंगाचे कपडे परिधान करण्यामागे काय कारण होते आणि कोणत्या धारणा होत्या त्यामगची नेमकी कारण काय? हे पाहूया.

म्हणून पांढरे कपडे परिधान केले जातात

होळीचा सण हा उन्हाळ्यात येतो आणि उन्हाळ्यात पांढरे कपडे परिधान करणे चांगले मानले जाते. पांढ-या रंगांच्या कपड्यांकडे सुर्यकिरण अधिक प्रकर्षाने येत नसल्याने, कडक उन्हात पांढरे कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे होळीला पांढरे कपडे फार पूर्वीपासून परिधान करण्याची प्रथा आहे.

( हेही वाचा: Hijab Controversy: काय म्हणतायेत मुस्लिम महिला संघटना आणि वकील? जाणून घ्या )

पांढ-या रंगाचे महत्त्व

तसेच, रंगपंचमीला रंग खेळले जातात. पांढ-या या एकमेव रंगावर सगळे रंग मिसळून जातात, एकरुप होतात. रंगपंचमी हा सण सगळं वैर विसरून, खेळला जाणारा सण आहे. त्यामुळे पांढ-या रंगांचे कपडे परिधान केले जात असावेत. अशा अनेक कारणांमुळे रंगपंचमीला पांढ-या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.