गूगल खास प्रसंगी किंवा विशेष दिवस असल्यास डूडलद्वारे संदेश देते. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिवसाचे औचित्य साधत गूगलने एक खास डूडल बनवून पृथ्वीचे स्वरूप कसे बदलत गेले याविषयीची माहिती दिली आहे.
( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )
वेगवेगळ्या स्वरुपांचे छायाचित्र
आजच्या डूडलमध्ये गुगलने काही छायाचित्रे दाखवली आहेत. त्यात हवामान बदलाचा पृथ्वीवर कसा परिणाम झाला हे सांगितले आहे. या डूडलमध्ये चार चित्रे आहेत, ज्यात टांझानियामधील माउंट किलिमांजारो, सेमरसूक ग्रीनलँड, ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ आणि जर्मनीतील अलंडमधील हार्ज फॉरेस्ट यांचा समावेश आहे.
1970 मध्ये पहिल्यांदा साजरा झाला पृथ्वी दिवस
1970 मध्ये पहिल्यांदा जागतिक पृथ्वी दिवस 2022 साजरा करण्यात आला होता. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, ज्युलियन कोनिग यांनी या दिवसाला पृथ्वी दिवस असे नाव दिले होते.
यंदाची थीम
या वर्षी पृथ्वी दिन 2022 ची थीम ‘इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट’ अशी आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये, ‘Restore Our Earth’ही थीम होती.
Join Our WhatsApp Community