बर्गर विकणारा ‘असा’ झाला मालामाल!

काही दिवसांपूर्वीच क्रिप्टो करन्सी चर्चेत होती. क्रिप्टो करन्सी एक्सचेंज करणे हे कायदेशीर आहे किंवा नाही, तसेच त्यात गुंतवणूक करणे योग्य की अयोग्य, असे अनेक प्रश्न आहेत. कारण क्रिप्टो करन्सीमुळे काही जण श्रीमंत झाले, तर काही जणांना क्रिप्टो करन्सीमुळे पैसे गमवावे लागले आहेत. पण याच क्रिप्टो करन्सीमुळे चांगपोंग झाओ याचे नशीब फळफळले आहे.

अंबानीलाही टाकले मागे 

मॅकडोनल्डचा माजी कर्मचारी असलेला चांगपोंग झाओ याने 2017 मध्ये बिनन्स नावाचे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सुरु केले. चांगपेंग झाओ हे क्रिप्टो स्पेसमध्ये सीझेड नावाने प्रसिद्ध आहे. ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार, चांगपेंग झाओ यांची एकूण संपत्ती सध्या 96 अब्ज डॉलर्स आहे. चांगपेंग झाओने नेट कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले आहे. त्यामुळे बर्गर विकणारा क्रिप्टो करन्सीमुळे अब्जाधीश झाला आहे.

अल्पावधीतच बनला अब्जाधीश

श्रीमंतांच्या यादीत त्याने आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींनाही मागे टाकले आहे. कारण मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 92.9 अब्ज डॉलर इतकी आहे. ब्लूमबर्गच्या या यादीत भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचाही समावेश आहे. अदानी यांची एकूण संपत्ती 78.6 अब्ज डॉलर इतकी आहे. महत्त्वाचे म्हणजे चांगपेंग झाओ यांची क्रिप्टो एक्सचेंज बिनन्स कंपनी जवळपास साडेचार वर्षांपूर्वी सुरू झाली होती. तर या यादीतील इतर अनेक लोकांच्या कंपन्या अनेक दशकांपासून सुरू आहेत आणि विशेष बाब अशी की, ब्लूमबर्गने चांगपेंग झाओ याने Bitcoin आणि Binance Coin मध्ये गुंतवलेले पैसे समाविष्ट केलेले नाहीत. म्हणजेच त्याची संपत्ती 96 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: …तो ही हुंडाच म्हणता येणार! काय म्हणाले न्यायालय? )

बिल गेट्सपेक्षाही जास्त असू शकते संपत्ती

झाओच्या वैयक्तिक क्रिप्टोकरन्सी होल्डिंग्सचाही हिशोब केला, तर त्याची एकूण संपत्ती बिल गेट्सइतकी असू शकते, असे सांगण्यात येत आहे. बिल गेट्स सध्या 134 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हा अंदाज झाओच्या बिनन्समधील स्टेकबाबत आहे. 2021 मध्ये Binance ने $20 अब्ज कमाई केल्याचे सांगितले जात आहे. झाओकडे या कंपनीचे 90 टक्के शेअर्स आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here