जशी प्राण्यांना जगण्यासाठी अन्न आणि पाण्याची गरज असते तशीच स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर्स आणि इअरफोन्स, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सातत्याने चार्ज करण्याची गरज असते. त्यामुळे चार्जरशिवाय असलेल्या महागड्या डिव्हाईसची किंमत ही केवळ शून्य आहे.
पण अनेकदा वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेल्या मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचे चार्जर हे वेगवेगळे असतात. त्यामुळे अनेकदा चार्जर नसला की दुस-या चार्जरने फोन चार्ज करायला अडचणी येतात. त्यामुळे केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व स्मार्ट उपकरणांसाठी कॉमन चार्जिंग पोर्टवर सहमती झाली असून, त्याला संमती मिळाल्यास एकाच कॉमन चार्जिंग पोर्टचा मार्ग सुकर होणार आहे.
(हेही वाचाः IRCTC बदलणार जेवणाचा मेनू, भारतीय रेल्वे प्रवाशांना देणार ‘ही’ खास सुविधा)
मोबाईल कंपन्यांची सहमती
ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत स्टेकहोल्डर्समध्ये स्मार्ट उपकरणांसाठी कॉमन चार्जिंग पोर्टवर सहमती झाली असून, वन नेशन वन चार्जरच्या संकल्पनेला मोबाईल कंपन्यांनी देखील दुजोरा दिला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने याची माहिती दिली असून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ही संकल्पना देशात राबवणे सोपे होणार आहे.
असा होणार फायदा
भारतात स्मार्टफोन आणि फीचर फोनचे चार्जर हे वेगळेकेंद असतात. बहुतांश स्मार्टफोनमध्ये सी टाईप चार्जिंग पोर्ट देण्यात येतात. त्यामुळे स्मार्टफोन,लॅपटॉप,टॅब,ब्लूटूथ स्पीकर्स आणि इअरफोन्स यांसारख्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या डिव्हाईसेससाठी एक चार्जर तर फीचर फोनसाठी वेगळा चार्जर अशा दोनच चार्जिंग पोर्टना परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येऊ शकतो.
(हेही वाचाः रेल्वे रुळांवर आता दिसणार नाहीत दगड, भारतीय रेल्वे नवीन ट्रॅक बसवण्याच्या तयारीत)
अनेक घरांत सध्या एकापेक्षा जास्त स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या डिव्हाईसचा वापर होतो त्यामुळे हे सर्व डिव्हाईस एकाच चार्जरने चार्ज होणार असल्याने वापरकर्त्यांना वेगवेगळे चार्जर ठेवायची गरज नाही आणि त्यासाठी लागणारा खर्चही कमी होईल, असे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community