रेल्वे स्थानकांवर ‘एक स्थानक-एक उत्पादन’; काय आहे हा नवा उपक्रम?

167

स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, कलाकारांच्या कलेला वाव मिळावा, या हेतूने रेल्वे मंत्रालयाने देशभरातील निवडक ७५० रेल्वे स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ (एक स्थानक-एक उत्पादन) हा उपक्रम राबविला आहे. यात पुणे स्थानकाचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे प्रशासन नाममात्र दरात म्हणजे दोन हजारात भाडे तत्वावर हा स्टॉल उपलब्ध करून देत आहे.

( हेही वाचा : बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! SBI अंतर्गत बंपर भरती; असा करा अर्ज)

‘वोकल फॉर लोकल’

ऑक्टोबर पासून हे स्टॉल ग्राहकांच्या सेवेत येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम असून रेल्वे मंत्रालय यासाठी विशेष परिश्रम घेत आहे. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून हा उपक्रम देशभरातील ७५० स्थानकांवर राबविला जात आहे. यासाठी वेगळ्या पद्धतीचे स्टॉल तयार केले जात आहेत. स्टॉल धारकांना केवळ त्यांच्या उत्पादनाची स्थानकावर विक्री करायची आहे. तसेच स्टॉलचे लाईट बिल भरावे लागेल.

स्टॉल उभारण्यात येणार

पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, जयसिगपूर, हातकणंगले, सातारा, शिवाजीनगर, खडकी, पिंपरी,चिंचवड आदी स्थानकांवर यासाठीचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या काही निवडक स्थानकांवर देखील अशा पद्धतीचे स्टॉल उपलब्ध असतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.