-
ऋजुता लुकतुके
वनप्लस कंपनीने नवनवीन फोन बाजारात आणण्याचा धडाकाच लावला आहे. गेल्यावर्षीच्या वनप्लस १२ मालिकेनंतर यंदा ऑक्टोबरमध्ये कंपनीने आधी चीनमध्ये (China) १३ आणि १३ आर ही मालिका लाँच केली होती. त्यानंतर आता वनप्लसचा हा फोन भारताही दाखल झाला आहे. वन प्लसचीच उपकंपनी असलेल्या ओपोने (Oppo) आधीच या फोनचे फिचर लोकांसमोर एका व्हिडिओतून आणले होते.
क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन ८ प्रोसेसर असलेला हा पहिला फोन असेल. त्यामुळे कंपनीचा अद्ययावत प्रोसेसर या फोनमध्ये असेल. फोनच्या कामगिरीबद्दल त्यामुळेच कुतुहल आहे.
कंपनीच्या भारतातील अधिकृत ट्विटर हँडलवर लाल आणि सफेद रंगातील वनप्लस १३ (OnePlus 13) फोन दाखवण्यात आले आहेत. अगदी हात ओले असताना तु्म्ही हा फोन सफाईने वापरू शकता, असं तंत्रज्जान यात आहे. शिवाय ६,००० नीट्स एवढी प्रखरता असलेल्या या फोनमुळे नजरेलाही त्रास होत नाही, असा कंपनीचा दावा आहे.
(हेही वाचा – Cold Wave In Mumbai : पुढील २ दिवस हुडहुडी भरणार; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता)
🔴 or ⚪#OnePlus #OnePlus13 pic.twitter.com/khhqHaUuLX
— OnePlus Club (@OnePlusClub) January 6, 2025
या फोनचा डिस्प्ले ६.७८ इंचांचा आहे. आणि या फोनबरोबर १०० वॅटचा वायर असलेला चार्जर तर ५० वॅटचा वायरलेस चार्जर देण्यात आला आहे. फोनची बॅटरीही ६,००० एमएएच क्षमतेची म्हणजे तगडी आहे. फोनचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. तर अल्ट्रावाईड लेन्सही ५० मेगा पिक्सेलची आहे.
चीनमध्ये या फोनची किंमत ४,७०० सियान इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये हा फोन ५५,००० रुपयांपासून पुढे सुरू होईल अशी शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community