-
ऋजुता लुकतुके
वनप्लस कंपनीने अलीकडेच १२ मालिकेतील १२टी हा फोन भारतीय बाजारात आणला आहे. आणि इतक्यात जागतिक पातळीवर १३ वी मालिकाही आणण्याची तयारी सुरू केली आहे. चीनमध्ये ३१ ऑक्टोबरला वनप्लस १३ (OnePlus 13) मालिका लाँच होत आहे. आणि त्यापूर्वी वनप्लसची उपकंपनी असलेल्या ओपोने वनप्लस १३ (OnePlus 13) चे फिचर्स उघड केले आहेत. क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन ८ प्रोसेसर असलेला हा पहिला फोन असेल. त्यामुळे कंपनीचा अद्ययावत प्रोसेसर या फोनमध्ये असेल. फोनच्या कामगिरीबद्दल त्यामुळेच कुतुहल आहे.
चीनमधील विबो या वेबसाईटवर वनप्लस १३ (OnePlus 13) फोनचे काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. आणि ते अधिकृत असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. अगदी हात ओले असताना तु्म्ही हा फोन सफाईने वापरू शकता, असं तंत्रज्जान यात आहे. शिवाय ६,००० नीट्स एवढी प्रखरता असलेल्या या फोनमुळे नजरेलाही त्रास होत नाही, असा कंपनीचा दावा आङे.
(हेही वाचा – Vivo Y300 Series : विवोचा नवीन वाय३०० फ्लॅगशिप फोन भारतात कधी होणार लाँच?)
OnePlus 13 is launching on 31st October in China 🔥
OnePlus 13 Specs 👀
⏩️ 6.82” BOE X2 micro quad curved 10 bit 8T LTPO OLED display with good PWM dimming
⏩️ Snapdragon 8 Extreme Edition + LPDDR5X RAM + UFS 4.0 storage
⏩️ 6000/6100 mAh battery + 100 W wired charging + 50… pic.twitter.com/R6sDJ6UNKR— Anir Chakraborty (@encoword) October 21, 2024
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; महायुतीच्या ९, तर महाविकास आघाडीच्या २१ जागांचा पेच कायम)
या फोनचा डिस्प्ले ६.७८ इंचांचा आहे. आणि या फोनबरोबर १०० वॅटचा वायर असलेला चार्जर तर ५० वॅटचा वायरलेस चार्जर देण्यात आला आहे. फोनची बॅटरीही ६,००० एमएएच क्षमतेची म्हणजे तगडी आहे. फोनचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. तर अल्ट्रावाईड लेन्सही ५० मेगा पिक्सेलची आहे.
चीनमध्ये या फोनची किंमत ४,७०० सियान इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये हा फोन ५५,००० रुपयांपासून पुढे सुरू होईल अशी शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community