OnePlus Open : वन प्लस कंपनीचा फोल्डेबल मोबाईल लाँच 

वन प्लस कंपनीचा वन प्लस ओपन हा फोल्डेबल मोबाईल फोन शुक्रवारी लाँच होतोय. पण, त्याच्या फिचर्सविषयी कंपनीने उत्सुकता ताणून धरली आहे

120
OnePlus Open : वन प्लस कंपनीचा फोल्डेबल मोबाईल लाँच 
OnePlus Open : वन प्लस कंपनीचा फोल्डेबल मोबाईल लाँच 

ऋजुता लुकतुके

सॅमसंग गॅलेक्सी ५ फोल्ड शी स्पर्धा करण्यासाठी वनप्लस (OnePlus Open) कंपनीने आपला वनप्लस ओपन हा फोल्डेबल मोबाईल फोन शुक्रवार १९ ऑक्टोबरला बाजारात आणला आहे. हा फोन कसा दिसतो याची एक झलक गेल्या आठवड्यात कंपनीने ग्राहकांना दिली होती. पण, त्याशिवाय इतर कुठलीही तांत्रिक माहिती अजूनही कंपनीने उघड केलेली नाही. त्याविषयीची उत्सुकता अजून ताणलेलीच आहे.

पण, काही महत्त्वाची ॲप या फोनमध्ये आधीच टाकलेली असतील, असं कंपनीने म्हटलं आहे. हा फोन फोल्डेबल असल्यामुळे नियमित ॲपमध्ये काही बदल करावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे वनप्लस कंपनीने मूळ ॲपच्या मालक कंपनीशी संपर्क करून ती फोल्डेबल फोनमध्ये आधीच बसवून घेतली आहेत.

लोकांना ही ॲप वापरण्याचा अनुभव नेहमीसारखा सोपा आणि सुटसुटीत असावा यासाठी कंपनीने ही खबरदारी घेतली आहे. वनप्लस कंपनीनेच एका प्रसिद्‌धी पत्रकात ही माहिती दिली होती.

(हेही वाचा-Honor 90 Pro : Amazon Great India Festival मध्ये हॉनरचा ‘हा’ फोन मिळतोय २५,७४९ रुपयांमध्ये )

भारतात सध्या सॅमसंग गॅलेक्सी ५ फोल्ड आणि फँटम टोक्नो व्ही फोल्ड हे दोनच फोल्डेबल फोन उपलब्ध आहेत. त्यापैकी सॅमसंगची किंमत १,५४,००० रुपयांपासून सुरू होते. तर फँटम कंपनीचा फोन ८८,००० रुपयांचा आहे. वनप्लसने आपले दर या दोघांच्या मधले ठेवले आहेत. वन प्लस ओपनचा सुरुवातीचा फोन १,३९,९९९ रुपयांना उपलब्ध असेल.

चिनी चॅटस्टेशन या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या फोनचा एमोल्ड डिस्प्ले टीके क्षमतेचा असेल. आणि ७.८ इंचांची स्क्रीन यात देण्यात आली आहे. निट्स पीक प्रखरता २,८०० नीट्सची आहे. या फोनमध्ये तीन कॅमेरे असतील. आणि त्यांची क्षमता ४८ मेगापिक्सल, ६४ मेगापिक्सल पेरिस्कोप लेन्स तसंच ४८ मेगापिक्सल अल्ट्रावाईड लेन्स इतकी आहे.

याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात वनप्लस (OnePlus Open) कंपनीने आपला फोल्डेबल फोन बाजारात आणण्याची मनिषा बोलून दाखवली होती. आणि बॉलिवू़ड स्टार अनुष्का शर्माने सप्टेंबर महिन्यातच हा फोन वापरल्याचं एका फोटो शूटमध्ये दिसलं होतं.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.