अलिकडे सणासुदीच्या काळात प्रत्यक्ष शॉपिंगपेक्षा अनेक जण ऑनलाईन शॉपिंगला पसंती देतात. त्यामुळे दिवाळी सारख्या महत्वाच्या सणांमध्ये ऑनलाईन बाजारात चांगली तेजी आलेली असते. पण याच सणासुदीच्या काळांत होणा-या ऑनलाईन शॉपिंगमुळे 40 टक्के भारतीयांची फसवणूक होत असल्याचा दावा एका अभ्यासाद्वारे करण्यात आला आहे.
ऑनलाईन शॉपिंगबाबत सर्व्हे
ग्लोबल लीडर नॉर्टनद्वारे ऑगस्ट 2022 मध्ये भारतात एक ऑनलाईन सर्व्हे करण्यात आला होता. त्यात ही माहिती समोर येत आहे. या ऑनलाईन सर्व्हेद्वारे 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणा-या 1001 भारतीय लोकांची मते घेण्यात आली. या भारतीयांना सणासुदीच्या काळात होणारे ऑनलाईन शॉपिंग आणि सायबर सुरक्षा याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते.
(हेही वाचाः 2025 पर्यंत भारतात मधुमेही रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढणार? काय आहे WHO चा रिपोर्ट)
काय सांगतो अहवाल
या सर्व्हेनुसार 2022 मध्ये तब्बल 61 टक्के भारतीयांना सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगला पसंती दर्शवली आहे. यामध्ये सर्वाधिक खरेदी ही स्मार्टफोन्सची करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट वॉच आणि स्मार्ट होम डिव्हाईसला देखील भारतीयांनी ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून पसंती दर्शवली आहे.काही टेक्नॉलजी प्रोडक्ट्सवर आकर्षक सूट मिळत असल्यामुळे 29 टक्के भारतीयांनी फेक लिंक्सवर क्लिक केल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे.
या माध्यमातून ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक होत आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या भारतीयांचे सरासरी 6 हजार 216 रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही या सर्व्हेतून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community