ऋजुता लुकतुके
कोरोना नंतरच्या काळात ऑनलाईन व्यवहारांची (Online Transaction) संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम यासारख्या मोबाईल ॲपचा वापर तर मुंबई-पुण्याच्या बाहेरील महानगरांमध्येही सर्रास सुरू झाला आहे. गुगल पे, फोन पे सारखी ॲप तुम्हाला पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी मदत करतात. पण, त्यासाठी तुम्ही एखादं बँक खातं या ॲपला जोडत असता. म्हणजे तुमचे पैसे वळते होतात किंवा जमा होतात ते ॲपला जोडलेल्या खात्यात.
म्हणूनच अशा मोबाईल ॲपना थर्ड पार्टी ॲप म्हणतात. जे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैशाची देवाणघेवाण (Online Transaction) करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावतात. सध्या भारतात अक्षरश: करोडो लोक अशा ॲपचा वापर करतात.
पण, इथून पुढे कदाचित अशी ॲप वापरण्याची गरजच आपल्याला लागणार नाही. युपीआय क्षेत्रातील एका नवीन शोधामुळे हे शक्य होऊ शकेल. युपीआयचा आताचा (Online Transaction) चेहरा त्यामुळे बदलू शकेल.
या नवीन प्रणालीचं नाव आहे युपीआय प्लगिन! सध्याच्या युपीआय प्रणालीचंच हे आधुनिक रुप असणार आहे. त्याचं शास्त्रीय नावं असेल मर्चंड एसडीके (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट). हे प्लगिन तुमचा वेळही वाचवेल आणि वापरायला सुटसुटीतही असेल. इंटरनेटचा (Online Transaction) कमीत कमी अडथळा या प्लगिनला होईल.
प्लगिन कसं काम करेल?
प्लगिनचं काम समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. तुम्ही स्विगीवर एखादी ऑर्डर बुक केली आणि पैसे भरताना युपीआय हा पर्याय निवडलात. तर आतापर्यंत स्विगीची वेबसाईट तुम्हाला एखाद्या युपीआय ॲपच्या (उदा. गुगल पे, फोन पे इ) साईटवर नेत असे. म्हणजे स्विगीच्या ॲपमधून बाहेर पडून तुम्ही युपीआय ॲपवर परस्पर जात होता. तिथे तुम्हाला पैसे भरण्याची (Online Transaction) प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती आणि मग स्विगी तुमची ऑर्डर मान्य करत होतं.
अनेकदा इंटरनेटच्या व्यत्ययामुळे यात अडथळाही येत होता. काही वेळा व्यवहार (Online Transaction) पूर्णच होत नव्हते. पण, आता युपीआय प्लगिनमुळे तुम्ही व्यवहार करत असलेली साईट किंवा ॲप थेट तुमच्या बँकेशी संपर्क करू शकेल आणि तुमचे पैसे वळते होतील.
युपीआयच्या माध्यमातून पैसे (Online Transaction) हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पेटीएम, रेझरपे यासारख्या कंपन्या तांत्रिक मदत करतात. अशा कंपन्यांनी युपीआय प्लगिन लागू करण्याच्या दृष्टीने बदल करायला सुरुवातही केली आहे. जस्टपे कंपनीनेही अलीकडेच असे तांत्रिक बदल केले आहेत.
या प्लगिनमुळे व्यवहार पूर्ण होण्याचा दर १५ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे.
(हेही वाचा – धावत्या वाहनातच विधवेवर सामूहिक बलात्कार, चौघांवर गुन्हा दाखल)
गुगलपे फोन पे राहील की जाईल?
भारतातील ऑनलाईन (Online Transaction) व्यवहारांपैकी 60% व्यवहार युपीआय प्रणालीतून होतात. आणि यात फोन पेचा वाटा 47 टक्के कर गुगल पे चा वाटा 33 टक्के आहे. अशावेळी युपीआय प्लगिन सुरू झाल्यावर अशी मोबाईल ॲप बंदच होतील का असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
पण, याला उत्तर आहे नाही!
कारण, मर्चंड टू कस्टमर म्हणजे ई-कॉमर्स साईटवरून (Online Transaction) असे व्यवहार करताना यूपीआय प्लगिन वापरता येईल. बाकी छोट्या मोठ्या व्यवहारांसाठी मोबाईल ॲपचा आताचाच वापर सुरू राहील. युपीआयच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यवहार करणंही हळू हळू जास्त सोपं होणार आहे.
त्यामुळे ही मोबाईल ॲप बंद (Online Transaction) होणार नाहीत. पण, त्यांची उलाढाल मात्र नक्की कमी होईल. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यासारख्या ई-कॉमर्स साईट किंवा ड्रीन11 आणि इतर गेमिंग साईटवर खूप मोठे व्यवहार हे युपीआयने होतात. त्यासाठी सध्या ही मोबाईल ॲप वापरली जातात. गुगल पे किंवा फोन पे सारख्या ॲपचा खूप मोठा मिळकतीचा हिस्सा हा अशा प्लॅटफॉर्ममधून येतो. तो हिस्सा मात्र नजिकच्या काळात कमी होऊ शकतो.
विशेष म्हणजे कित्येक ई-कॉमर्स सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी युपीआय प्लगिन तीन किंवा सहा महिन्यांत सुरू करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात युपीआय वापरामध्ये खूपसे बदल होणार हे नक्की आणि त्यासाठी तयार राहा. आपल्याकडे युपीआय व्यवहारांवर लक्ष ठेवणारी नियामक संस्था आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI). ही संस्था सध्या युपीआय प्लगिन आणि ते आल्यावर इतर ॲपवर त्याचा होणारा परिणाम यांवर गांभीर्याने विचार करत आहे. त्यानंतर देशाचं युपीआय प्लगिनविषयीचं धोरण स्पष्ट होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community